शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्वे उत्पादनांवर कारवाईची मुभा

By admin | Updated: June 25, 2015 03:08 IST

मॅगीचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

नागपूर : मॅगीचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अ‍ॅम्वे इंडिया कंपनीच्या वादग्रस्त उत्पादनांसंदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याची भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणला मुभा दिली. यामुळे जोमाने कामाला लागण्याचा मार्ग प्राधिकरणसाठी मोकळा झाला आहे.अ‍ॅम्वे कंपनीची वादग्रस्त उत्पादने बाजारातून मागे घेण्यासाठी सचिन खोब्रागडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिका प्रलंबित असल्यामुळे प्राधिकरणने कारवाई थांबविली होती. याकडे लक्ष वेधण्यात आल्यानंतर न्यायालयाने प्राधिकरणला कायद्यानुसार कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले. तसेच, गुणवत्ता व सुरक्षिततेच्या तपासणीसाठी प्रलंबित उत्पादनांची प्रकरणे वेगात निकाली काढण्याचे निर्देश प्राधिकरणला देण्यात आले आहेत. अ‍ॅम्वे कंपनीची ३७ उत्पादने बाजारात असून त्यापैकी केवळ ७ उत्पादनांना मान्यता आहे. सात उत्पादने नामंजूर करण्यात आले आहेत तर, उर्वरित उत्पादनांची गुणवत्ता व सुरक्षिततेची तपासणी प्रलंबित आहे. शारीरिक त्रुटी दूर करण्यासाठी ही उत्पादने उपयोगी सिद्ध होतात असा दावा कंपनीतर्फे केला जातो. कंपनीची देशातील वार्षिक उलाढाल २१०० कोटींवर रुपयांची असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. केंद्र शासनाने ५ आॅगस्ट २०११ पासून देशात अन्न सुरक्षा व माणक कायदा-२००६ लागू केला आहे.कंपनीने या कायद्यानुसार मिळविलेल्या एका परवान्याची मुदत ३१ मार्च २०१२ रोजी संपली आहे, याकडेही याचिकाकर्त्याने लक्ष वेधले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)