शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचे अपहरण करून हत्या

By admin | Updated: April 17, 2017 21:40 IST

तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. निकेश विजय साठवणे (वय २५) असे मृताचे नाव असून, तो गेल्या ९ एप्रिलपासून बेपत्ता होता.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 17 - तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. निकेश विजय साठवणे (वय २५) असे मृताचे नाव असून, तो गेल्या ९ एप्रिलपासून बेपत्ता होता. सोमवारी त्याचा मृतदेह विहिरीत सापडला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या शरीरावर शस्त्राने भोसकल्याच्या अनेक खुणा आढळल्या. त्यामुळे त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.निकेश आॅटो चालवत होता. ९ एप्रिलपासून तो अचानक बेपत्ता झाला. त्याचा ठिकठिकाणी शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे पालकांनी नंदनवन ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली. पालक आणि पोलीस निकेशचा शोध घेत असताना वाठोड्यातील एका विहिरीतून दुर्गंध येत असल्याने काही जणांनी तिकडे धाव घेतली. विहिरीत मृतदेह आढळल्याने पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह विहिरीबाहेर काढला. तो निकेश साठवणेचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या खुणा होत्या. मृतदेह रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांशी पोलिसांनी चर्चा केली, तेव्हा निकेशची शस्त्राचे घाव घालून हत्या झाल्याचा अंदाज काढण्यात आला. त्यामुळे निकेशचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा गुन्हा नंदनवन पोलिसांनी दाखल केला. त्याच्या हत्येच्या संशयावरून पोलिसांनी प्रारंभी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर या हत्येत एका महिलेचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली.