शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाच्या दादाची राजकीय दादांकडून अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

नागपूर : केवळ दीड एकर मालकीची जमीन असलेल्या स्व. दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाचे नऊ वाण विकसित केले. त्याच वाणाच्या ...

नागपूर : केवळ दीड एकर मालकीची जमीन असलेल्या स्व. दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाचे नऊ वाण विकसित केले. त्याच वाणाच्या भरवशावर पाच राज्यातील लाखो हेक्टर जमिनीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या या कार्याची दखल राजकीय नेत्यांना कधीच घेता आली नाही. दखल घेतली ती केवळ त्यांच्या निधनानंतर सांत्वना देण्यासाठी. त्याचवेळी या राजकीय दादांनी सच्च्या दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मारक उभारण्याची व त्यांना पद्मपुरस्कार देण्याची घोषणा केली. दिवस गेला, वेळ गेली आणि दादा त्यांच्या विस्मृतीसही गेले, अशी वास्तविकता आहे. विशेष म्हणजे, तुरुंगात असलेल्या राजकीय नेत्यांवर लाखोचा खर्च करणारे सरकार, पक्षाघात झाला तेव्हा दादांवरील उपचारासाठी कधीच सरसावले नाही. सरकारी व्यवस्थेने जगाच्या या पोशिंद्याला वाऱ्यावर सोडले. महाराष्ट्र शासनाने त्यांना २००६ मध्ये कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित केले होते. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा शासनाने पुरस्कारादाखल दिलेले सुवर्णपदक विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते सुद्धा पितळेचे निघाले. याच महिन्यात ३ जून रोजी त्यांचा तिसरा स्मृतिदिन होता. मात्र, तांदळाच्या वाणाचा आविष्कार करणाऱ्या या थोर संशोधकाबाबत शासनालाही विसर पडलेला दिसतो, अशी वेदना लोकविद्यापीठाचे संचालक डॉ. प्रकाश घवघवे यांनी व्यक्त केली.

........................