शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित- बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी खंडांचा होणार मराठीत अनुवाद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली. सदस्य सचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लोकमतने बुधवारी त्यांच्याशी विशेष संवाद साधला. तेव्हा त्यांनी यासंदर्भात मनमोकळी चर्चा केली. डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले की, बाबासाहेबांचे विचारधन हे देशाला दिशा देणारे आहे. त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त विचारधन हे पुस्तक रूपाने लोकांपर्यंत यावे, यासाठी चरित्र साधने समिती कार्यरत आहे. मी नुकताच सदस्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. एकूणच चार टप्प्यांवर काम करण्यावर आम्हाला काम करावे लागणार आहे. त्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. सर्वात प्रथम म्हणजे बाबासाहेबांच्या सर्व प्रकाशित इंग्रजी खंडांचे मराठी भाषेत अनुवाद करून ते नव्याने प्रकाशित करायचे. यासोबतच आजवरच्या सर्व अनुवादित साहित्याचे पुनर्मुद्रण करणे, तसेच बाबासाहेबांचे नव-नवीन साहित्य शोधणे व त्याचे प्रकाशन करणे होय. याशिवाय सोर्स मटेरियल अंतर्गत ‘जनता’ या पाक्षिकांचे खंड प्रकाशित करण्यात येतील. चार टप्प्यातील ही कामे वाटतात तितकी सोपी नाहीत; परंतु योग्य नियोजन करून ही सर्व कामे समिती पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- ‘रुट्स ऑफ रिव्होलेशन’ लवकरच प्रकाशित होणार

सोर्स मटेरियल अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रुट्स ऑफ रिव्होलेशन’ हा खंड लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. तब्बल ७०० पानाचा हा खंड असून, त्याचे जवळपास सर्व काम झाले आहे. येत्या काही दिवसात हा खंड लोकांपर्यंत उपलब्ध होईल.

- मुंबईलाच राहून काम करणार

बाबासाहेबांच्या साहित्याच्या प्रकाशनाचे काम खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेण्यासाठी समितीच्या सदस्य सचिवाने पूर्णवेळ मुंबईला राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मुंबईलाच पूर्णवेळ राहण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एक-दोन दिवस नागपूरला येत-जात राहू; परंतु मुंबईलाच राहून समितीचे पूर्ण काम करण्यात येईल.

डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती