शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी व मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST

नागपूर : पत्नी व अडीच वर्षाच्या मुलाला मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम पोटगीवर आक्षेप घेणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

नागपूर : पत्नी व अडीच वर्षाच्या मुलाला मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम पोटगीवर आक्षेप घेणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दांत फटकारले. पत्नी व मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी पतीची आहे. पतीला या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही असे न्यायालयाने पतीला सुनावले आणि अंतरिम पोटगीचा आदेश कायम ठेवला.

प्रकरणावर न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पत्नीने तिला व मुलाला पोटगी मिळण्यासाठी नागपूर कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय तिने या याचिकेवर अंतिम निर्णय होईपर्यंत अंतरिम पोटगी मिळण्याची मागणीही केली होती. ३ जानेवारी २०२० रोजी कुटुंब न्यायालयाने पत्नीला २००० रुपये महिना अंतरिम पोटगी मंजूर केली. त्या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने ठोस कारणे नसताना वादग्रस्त आदेश दिला असे त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने पतीचे मुद्दे अमान्य करून अंतरिम पोटगीसाठी ठोस कारणांची गरज नसल्याचे स्पष्ट केले. कुटुंब न्यायालयाने पत्नी व मुलाला उपासमारीपासून वाचविण्यासाठी अंतरिम पोटगी दिली आहे, असे पतीला सांगण्यात आले. संबंधित दाम्पत्याचे लग्न २१ फेब्रुवारी २०१७ रोजी झाले आहे.

------------

पोलीस ठाण्यात छळाची तक्रार

पत्नीने पती हुंड्यासाठी छळत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे पतीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यावरून पती हा पत्नीचा छळ करीत असल्याचे व त्यामुळे पत्नी माहेरी राहत असल्याचे न्यायालयाला दिसून आले. त्याचा पतीला फटका बसला.

----------

पत्नीला ४८ हजार रुपये

उच्च न्यायालयाने पतीची याचिका ऐकण्यापूर्वी त्याला न्यायालयात ४८ हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पतीने ती रक्कम न्यायालयात जमा केली होती. न्यायालयाने ही रक्कम पत्नीला अदा केली आहे.