अनिल देशमुख यांच्यातर्फे आयोजन : तज्ज्ञांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकाटोल : स्थानिक नबीरा महाविद्यालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे ‘करिअर व्हिजन - २०१४’चे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन ना. अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तज्ज्ञ मुंबई येथील करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर, अध्यक्षस्थानी नबीरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निरंजन राऊत होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, सलील देशमुख, बन्सीलाल नबीरा, सत्येंद्र खोना, चंद्रशेखर मानकर, नगरसेवक गणेश चन्ने, लक्ष्मी जोशी, प्राचार्य मिलिंद पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित काकडे, अयुब पठाण, हेमराज रेवतकर, नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य सुरेंद्र गोळे यांच्यासह तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘आपल्याकडे जे नाही त्याकडे आपण नेहमी आकर्षित होतो. त्या गोष्टीला जास्त फोकस करतो. मात्र आपल्यामध्ये असलेली क्षमता ओळखून करिअर निवडल्यास त्या क्षेत्रात यशस्वी होता येते’, असे मत मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांनी व्यक्त केले. याबरोबरच मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रात नोकरीची संधी असल्याचे सांगत वाणिज्य शाखेतील विविध अभ्यासक्रमाचीही माहिती मापुस्कर यांनी दिली. व्यक्तिमत्त्व विकासावर प्रा. रघटाटे, विविध अभ्यासक्रमाबाबत डॉ. अनिल शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनिल देशमुख यांनी तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आयुष्याची पायरी चढताना योग्य व आवडीचे शैक्षणिक क्षेत्र निवडता यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान, विविध शाखेचे अभ्यासक्रम, त्याची नोकरीच्या दृष्टीने प्रायोजकता, महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पदवी आणि पदव्युत्तर विविध शाखेतील १५ गुणवंतांचा सत्कार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पाटील यांनी केले. संचालन डॉ. सोनेगावकर यांनी केले आभार अमित काकडे यांनी मानले. आयोजनासाठी वायगावकर, संदीप ठाकरे, सौरभ ढोरे, संजय जगदळे, प्रा. परेश देशमुख, विशाल बावीस्कर, सूरज कोठे, विपूल पाठे, नीलेश दाहाट, विलास घारड, प्रवीण अरसडे, नितीन चालखोर, महेश येरपुडे यांच्यासह नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि नबीरा महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सुमारे अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची भरगच्च उपस्थिती होती. अशाप्रकारेच नरखेड येथील पंढरीनाथ महाविद्यालय, भारसिंगी येथील अरविंदबाबू देशमुख कॉलेजमध्येही आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
काटोलमध्ये ‘करिअर व्हिजन’ला प्रतिसाद
By admin | Updated: August 8, 2014 01:08 IST