शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या समस्यांचे निरपेक्षपणे समाधान करावे

By admin | Updated: May 24, 2016 02:55 IST

कर-प्रशासनाच्या न्यायविषयक पैलूंची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना नागरिकांच्या समस्यांचे निरपेक्षपणे समाधान करण्याच्या दिशेने ...

न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे : एनएडीटी येथे अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वर्गनागपूर : कर-प्रशासनाच्या न्यायविषयक पैलूंची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना नागरिकांच्या समस्यांचे निरपेक्षपणे समाधान करण्याच्या दिशेने अधिकाऱ्यांनी सतत प्रयत्नशील राहावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी येथे केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे सहायक आयकर आयुक्त या पदावर नुकतीच पदोन्नती मिळालेल्या आयकर अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे (उत्तरायण-२०१६) उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मुख्य आयकर आयुक्त (निवृत्त) दिलीप शिवपुरी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या महासंचालिका गुंजन मिश्रा, आर.के.चौबे, लीना श्रीवास्तव, मदनेश कुमार मिश्रा उपस्थित होते.(प्रतिनिधी)अधिकाऱ्यांच्या तुकडीत १६० प्रशिक्षणार्थी दोन महिन्यांच्या कालावधीचे प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तुकडीत १६० प्रशिक्षणार्थी असून या सर्वांना आयकर विभागात विविध नेमणूकानंतर सहायक आयुक्तपदी पदोन्नती दिली जाते. या तुकडीत १४ महिला अधिकारी असून तुकडीमधील अधिकाऱ्यांचा आयकर विभागातील सरासरी अनुभव २४ वर्षांचा आहे. २२ राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तुकडीत सर्वात जास्त पश्चिम बंगालचे ४९ अधिकारी आहेत. तुकडीतील अधिकाऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीसुद्धा विविध प्रकारची असून यामध्ये पदवीधर,अभियांत्रिकी, कायद्याचे पदवीधर व आचार्य पदवी प्राप्त केलेले अधिकारीही आहेत. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या शारीरिक सुदृढतेवरही पुरेसा भर दिला जातो. अकादमीमध्ये असणाऱ्या, व्यायामशाळा, आधुनिक जलतरण तलाव आणि उत्कृष्ट क्रीडा सुविधांचा वापर करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. दोन महिन्यांच्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमानंतर एक आठवडा भारत दर्शन आणि आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत एक आठवडा काम करण्याची संधी या अधिकाऱ्यांना मिळणार आहे.या प्रसंगी आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी, अकादमीमधील प्राध्यापक उपस्थित होते.सेवेचे गुण आत्मसात करावराळे म्हणाले, आयकर अधिकाऱ्यांना भारतीय राजस्व सेवेत प्रवेश करताना या सेवेचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे. एकंदरीत संपूर्ण भारतीय प्रशासनाची ओळख करून घेणे आवश्यक असते. सेवेची जबाबदारी सांभाळताना अधिकाऱ्यांनी आपल्या सर्वांगिण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी छंदही जोपासायला हवेत.दिलीप शिवपुरी यांनी भारतीय राजस्व सेवेतील सहायक आयुक्त या पदाचे महत्त्व विषद करताना या सेवेच्या कार्यकारी भूमिकेमुळे देशभरातील कर प्रशासन कुशलरीतीने चालते, असे मत व्यक्त केले.