शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात रेल्वेचे १२०० आरक्षण रद्द

By admin | Updated: July 31, 2015 02:51 IST

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्याचा..

याकूबच्या फाशीची धास्ती : घातपाताची भीती नागपूर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्याचा निर्णय झाल्यामुळे उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. फाशीच्या शिक्षेमुळे असामाजिक तत्त्व रेल्वेस्थानकात घातपात घडवून आणतील, अशी भीती वाटल्यामुळे २८ जूनला ५७७ तर २९ जूनला ६४० अशा १२१७ प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केल्याची माहिती आहे. यामुळे रेल्वेला तब्बल ६ लाख ७१ हजार ३७२ रुपये परत करण्याची पाळी आली.याकूब मेमनला नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्याचा निर्णय झाल्यानंतर उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. फाशीच्या निर्णयाचा निषेध म्हणून असामाजिक तत्त्व कुठलीही अप्रिय घटना घडवून आणू शकण्याची शक्यता होती. त्यामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. घातपात घडविण्याची सर्वात सोयीची जागा म्हणजे रेल्वेस्थानक आहे. नागपूर रेल्वेस्थानक देशातील संवेदनशील समजल्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. देशात कुठेही बॉम्बस्फोटाची घटना घडल्यास नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जाहीर करण्यात येतो. त्यामुळे याकूबच्या फाशीच्या निर्णयामुळे रेल्वेस्थानकावर किंवा रेल्वेगाडीत घातपात घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीसही त्या दृष्टीने सतर्क झाले होते. मागील पाच ते सात दिवसांपासून रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वानपथक, अत्याधुनिक शस्त्रधारी पोलीस, प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची बॅग स्कॅनर, मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात येत होती. ही सर्व सुरक्षा व्यवस्था पाहून २८ जुलैला रेल्वेने प्रवास करणाऱ्या ५७७ प्रवाशांना या कालावधीत प्रवास करणे असुरक्षित वाटले आणि त्यांनी आपले तिकीट रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रेल्वेला त्यांना ३ लाख २३ हजार ९३३ रुपये परत करावे लागले. तर २९ जुलैला तब्बल ६४० प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केले. रेल्वेने त्यांना ३ लाख ४७ हजार ४३९ रुपये परत केले. दरम्यान याकूबला फाशी दिलेल्या ३० जुलैला किती प्रवाशांनी तिकीट रद्द केले याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने उपलब्ध होऊ शकली नाही.(प्रतिनिधी)