शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहारावर उत्तर द्या : हायकोर्टाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:13 IST

नागपूर फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर येत्या १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी माजी चीफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर (सीएफआय) एस.एम.ए. सलाम व महासंचालक नागरी उड्डयण यांना दिलेत.

ठळक मुद्देएस.एम.ए. सलाम यांच्यावर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर येत्या १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी माजी चीफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर (सीएफआय) एस.एम.ए. सलाम व महासंचालक नागरी उड्डयण यांना दिलेत.यासंदर्भात सुमेधा घटाटे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेमध्ये सलाम यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. या गैरव्यवहाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, विद्यार्थ्यांकडून अवैधपणे घेतलेले पैसे सलाम यांच्याकडून वसूल करण्यात यावेत व सलाम यांच्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी सीबीआयकडे सोपविण्यात याव्यात असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. डिसेंबर-२०१५ मध्ये सलाम यांचा नागपूर फ्लाईंग क्लबमधील करार संपला. त्यापूर्वी ते सिकंदराबाद येथील विंग्ज एव्हिएशन कंपनीत सीएफआय होते. विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, अकार्यक्षमता, विद्यार्थ्यांकडून अवैधपणे पैसे घेणे इत्यादी कारणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दहा दिवसांतच त्यांना नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये नियुक्ती देण्यात आली. सलाम यांच्याविरुद्धची चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करण्यात आली नाही. सलाम यांनी नागपूर फ्लाईंग क्लबमध्येसुद्धा गैरव्यवहार सुरू ठेवला. त्यांच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. श्रीनिवास देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार