शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सचे भाडेही तापले

By admin | Updated: May 4, 2015 02:23 IST

उन्हाळ््याच्या सुट्यात अनेकांनी बाहेरगावी जाण्याचा प्लॅन केल्यामुळे बसेस, रेल्वे, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल धावत आहेत.

नागपूर : उन्हाळ््याच्या सुट्यात अनेकांनी बाहेरगावी जाण्याचा प्लॅन केल्यामुळे बसेस, रेल्वे, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल धावत आहेत. याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे आकारणे सुरू केले आहे. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे हे भाडे तिप्पट करण्यात आले आहे. प्रवाशांना ९०० रुपयांऐवजी तब्बल २५०० रुपये मोजावे लागत असून त्यांची सर्रास लूट होत आहे.खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे उन्हाळ््याच्या सुट्यात ट्रॅव्हल्स संचालकांनी आपल्या मनाप्रमाणे वाढविल्यामुळे प्रवाशांची सर्रास लूट होताना दिसत आहे. उन्हाळ््यात मुलांना सुट्या लागल्यानंतर अनेक पालक बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात. तर काही नागरिक आप्तेष्टांच्या लग्नासाठी कुटुंबासह जाण्यासाठी आधीच आपले बुकिंग करतात. यामुळे सध्या खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीटही मिळेनासे झाले आहे. बुकिंग करण्यासाठी गेल्यानंतर प्रवाशांना पाच ते सहा दिवसानंतरचे तिकीट उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. यात प्रवाशांकडून सर्रास दुप्पट ते तिप्पट प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासभाड्यावर कुणाचाच अंकुश नाही. नेमका याच बाबीचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक घेऊन प्रवाशांची लूट करीत आहेत. उन्हाळ््यात आपल्या कुटुंबीयांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी नागरिकांवर या चढ्या भावाने तिकीट खरेदी करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक घेताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)