शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भदेचे झाले भाडे, गुगल ट्रान्सलेटरमुळे बदलली मतदारांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंग्रजीतून मराठी किंवा मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना गुगल भाषांतराचा (ट्रान्सलेटर) उपयोग करण्यात येतो. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : इंग्रजीतून मराठी किंवा मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना गुगल भाषांतराचा (ट्रान्सलेटर) उपयोग करण्यात येतो. यामुळे काम सोपे होत असल्याचे सांगण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाची मात्र गुगल ट्रान्सलेशनने डोकेदुखी वाढविली आहे. मतदार यादी तयार करताना गुगलच्या भाषांतरामुळे अऩेक मतदारांच्या नावातच बदल केला आहे. उदाहरणार्थ ‌‘भदे’चे ‘भाडे’ असे आडनाव करण्यात आले. त्यामुळे मतदारांची नावे शोधण्यात अडचण होत असून अनेक जण मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाची निवडणूक सुरू आहे. यंदा मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली. २ लाख ६ हजार मतदारांची नोंद झाली असून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत अनेक घोळ असल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्यात. एकाच कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळी मतदान केंद्र निश्चित करण्यात आलीत. त्याचप्रमाणे नावातही घोळ असल्याचे समोर आले आहे. नाव, आडनाव, वडिलांच्या नावात बदल असल्याचे सांगण्यात येते. इंग्रजीतील नाव व मराठीतील नावातही बदल आहे.

प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदार यादी तयार करताना गुगल भाषांतरकचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे मराठी आणि इंग्रजीतील नावात बदल झाला. यामुळे इंग्रजी आणि मराठीच्या नावात तफावत आहे. यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओळख पटवून मतदान करता येणार

मतदार यादीबाबतच्या काही तक्रारी आहेत. त्या तपासण्याच्या सूचना दिल्या. नावातील बदलासंदर्भातील काही प्रकरणे समोर आली आहेत. नावात बदल असल्यास संबंधितांच्या नावाची खात्री करून मतदान करण्यास परवानगी देण्याच्या सूचना सर्व प्रिसायडिंग अधिकाऱ्यांना देण्यात आल्‍या आहेत.

रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.