शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्रख्यात चित्रकार सुधीर तलमले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

नागपूर : अमूर्त (ॲब्स्ट्रॅक्ट) शैलीतील चित्रकारितेचा एक काळ गाजवणारे प्रख्यात चित्रकार सुधीर पुरुषोत्तम तलमले यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन ...

नागपूर : अमूर्त (ॲब्स्ट्रॅक्ट) शैलीतील चित्रकारितेचा एक काळ गाजवणारे प्रख्यात चित्रकार सुधीर पुरुषोत्तम तलमले यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व असंख्य असा शिष्य परिवार आहे.

सिरसपेठ, रेशीमबाग येथील निवासी सुधीर तलमले हे शहरातील प्रतिथयश असे चित्रकार होते. त्यांनी बी.एफ.ए. व एम.एफ.ए.चे शिक्षण नागपुरातून घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात नागपूर दूरदर्शनला त्यांनी ग्राफिक आर्टिस्ट म्हणून नोकरी केली. मात्र, अल्पावधीतच त्यांनी ती नोकरी सोडून मुक्त चित्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साधारणत: ३०-३५ वर्षे मुक्त चित्रकार म्हणून कारकीर्द घडविणारे सुधीर तलमले यांनी अमूर्त शैलीत छाप सोडली आहे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नागपूरसह मुंबई, दिल्ली व अन्य शहरांमध्ये लागलेले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून, त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे.

...................