शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

मनातूनही काढा व्हीआयपी भाव

By admin | Updated: May 5, 2017 02:42 IST

वाहनांवरील लाल दिवे काढून शासनाने नवीन युगात प्रवेश केला आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी आता मनातूनही व्हीआयपी भाव काढून टाकावा.

हायकोर्टाचे मत : लाल दिवे काढून नवीन युगात प्रवेश नागपूर : वाहनांवरील लाल दिवे काढून शासनाने नवीन युगात प्रवेश केला आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी आता मनातूनही व्हीआयपी भाव काढून टाकावा. त्यांनी स्वत:च्या विशेषाधिकाराचा वापर करून कुणालाही विनाकारण त्रास देऊ नये, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विदर्भ क्रिकेट संघटना व नागपूर पोलीस वादावरील निर्णयात व्यक्त केले. क्रिकेट सामन्याच्या पासेसवरून व्हीसीए व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यातून पोलिसांनी व्हीसीए पदाधिकाऱ्यांविरुद्ध दोन एफआयआर नोंदविले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने दोन्ही एफआयआर रद्द करून व्हीसीएला पासेस वितरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार व्हीसीएने मार्गदर्शक तत्त्वे तयार करून न्यायालयासमक्ष सादर केले. परंतु, राज्यघटनेनुसार व्हीसीए राज्य शासनाच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वांबाबत निर्देश देणे अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे स्पष्ट केले. तसेच, वरीलप्रमाणे मत मांडून पोलीस अधिकारी यापुढे क्रिकेट सामन्याच्या पासेस मिळविण्यासाठी अधिकाराचा दुरुपयोग करून व्हीसीएला त्रास देणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुरक्षा शुल्काला देणार आव्हान व्हीसीएकडे ग्रामीण पोलीस विभागाचे ४ कोटी ४० लाख रुपये सुरक्षा व्यवस्था शुल्क थकीत होते. व्हीसीएने यापैकी ३ कोटी २० लाख रुपये महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले आहेत. उर्वरित शुल्कावर व्हीसीएचा आक्षेप आहे. या शुल्काला व्हीसीए सक्षम प्राधिकाऱ्याकडे आव्हान देणार आहेत. त्यासाठी न्यायालयाने व्हीसीएला सहा महिन्यांचा वेळ मंजूर केला. जनहित याचिका निकाली व्हीसीएकडून थकीत सुरक्षा शुल्क वसूल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी दाखल केलेली जनहित याचिका न्यायालयाने निकाली काढली. व्हीसीएने मोठी रक्कम जमा केल्यामुळे याचिकेचा उद्देश पूर्ण झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. हरनिश गढिया तर व्हीसीएतर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली.