शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

रोबोटिक सर्जरीपासून गरीब रुग्ण दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कमी वेळेत, एका छोट्याशा चि-यातून मोठी शस्त्रक्रिया झाल्यास त्याचे मोठे फायदे आहेत. ‘रोबोटिक सर्जरी’मुळे ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कमी वेळेत, एका छोट्याशा चि-यातून मोठी शस्त्रक्रिया झाल्यास त्याचे मोठे फायदे आहेत. ‘रोबोटिक सर्जरी’मुळे हे शक्य झाले आहे. यामुळे आता नव्या अपेक्षेने याकडे पाहिले जात आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची गरज ओळखून ‘रोबोटिक सर्जरी’च्या यंत्रासाठी राज्य खनिकर्म महामंडळाकडून १६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी दिला. मेडिकल प्रशासनाने यंत्रसामग्री खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिन कंपनीकडे तो वळता केला. परंतु, दोन वर्षे होऊनही यंत्र खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. निधी मिळूनही रोबोटिक सर्जरीपासून गरीब रुग्णांना दूर ठेवले जात असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रोबोटिक सर्जरीमध्ये छोट्यात छोटा चिरा देऊन एक खूपच लहान ‘थ्रीडी’ कॅमेरा व सर्जिकल उपकरण रुग्णाच्या शरीरात पोहोचविले जाते. शस्त्रक्रियेसाठी लागणारे ३६० डिग्रीचे दृश्य कॅमे-यामुळे सहज सोपे होते. उपकरणाशी जुळलेल्या ‘रोबोटिक आर्म्स’च्या मदतीने डॉक्टरांना अचूक शस्त्रक्रिया करता येते. रोबोटच्या मदतीने झालेल्या शस्त्रक्रियेत रुग्ण लवकरच आपले सामान्य जीवन जगू शकतो. रुग्णालयात कमी वेळ घालवावा लागतो. शिवाय, जखम लवकर भरते. रक्त वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. शस्त्रक्रियेच्या खुणाही कमी होतात. महत्त्वाचे म्हणजे, निरोगी पेशींना कमीतकमी नुकसान पोहोचते. मेडिकलमध्ये येणा-या गरीब रुग्णांना या अद्ययावत रोबोटिक सर्जरीचा लाभ मिळावा, यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी पुढाकार घेतला. प्रशासनाला या सर्जरीचे महत्त्व पटवून दिल्याने तत्कालीन पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य खनिकर्म महामंडळाकडून निधी दिला. हाफकिनच्या खात्यात हा निधी जमा करण्यात आला. परंतु, दोन वर्षे होऊनही हाफकिनच्या संथगतीच्या कामकाजामुळे खरेदी प्रक्रिया पुढे सरकलीच नाही.

-केवळ ‘एम्स’मध्ये रोबोटिक सर्जरी

भारतात सध्या सुमारे १०० शस्त्रक्रिया करणारे यांत्रिक रोबोट आहेत. यातील बहुतांश पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई व दिल्लीच्या खासगी रुग्णालयांत आहे. शासकीय संस्थांपैकी केवळ ‘एम्स’मध्ये हा रोबोट उपलब्ध आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये हे यंत्र उपलब्ध झाल्यास याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे. परंतु, लोकप्रतिनिधीने यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-आणखी सहा महिने लागणार

अधिष्ठाताची जबाबदारी येताच रोबोटिक यंत्र मेडिकलमध्ये स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मागील दीड महिन्यापासून त्याचा पाठपुरावा केल्याने यंत्र खरेदीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परंतु, यंत्र येईपर्यंत साधारण सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या यंत्रामुळे विदर्भासह आजूबाजूच्या पाच राज्यांतील रुग्णांना लाभ होईल.

-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल