शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

५७ शाळांची अल्पसंख्यक श्रेणी काढा

By admin | Updated: August 25, 2014 01:14 IST

अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यातील ५७ शाळांची अल्पसंख्यक श्रेणी काढण्यात यावी. अशा शिफारशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या

जिल्हा परिषद : स्थायी समितीची शासनाकडे शिफारसनागपूर : अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यातील ५७ शाळांची अल्पसंख्यक श्रेणी काढण्यात यावी. अशा शिफारशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने शासनाने अटी व शर्तींच्या अधीन या शाळांना मंजुरी दिली आहे. परंतु येथे अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. दुसरीकडे अल्पसंख्यक शाळांना बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू होत नाही. त्यामुळे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यानाही २५ टक्के राखीव कोट्यातून प्रवेश मिळत नाही. या शाळांत अल्पसंख्यकांऐवजी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात असल्याच्या पालकांच्या तक्र ारी होत्या. चौकशीत या शाळांत अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) ललित रमटेके यांनी र्बैठकीत दिली. याची दखल घेत या शाळांची श्रेणी कमी करण्यासंदर्भात शासनाकडे शिफारस करण्याचे निर्देश अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी शिक्षण विभागाला दिले.जिल्ह्यात अल्पसंख्यक दर्जाच्या ५७ शाळा आहेत. यात उर्दू माध्यमाच्या २४, अल्पभाषिक २६, हिंदी भाषिक ५ व पारशी भाषेच्या एका शाळेचा समावेश आहे. माध्यमिक शाळांतील ७८८ तर प्राथमिक शाळांवरील २०५ शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. ३९ शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करू नये, असे निर्देश गोतमारे यांनी दिले.जिल्ह्यातील ९ आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी ३ लाखांचा खर्च करणे, २९ ग्रामपंचायतींना ६८९ विद्युत पोल व स्ट्रीट लाईट यासाठी समितीने ना-हरकत प्रमाणत्र देण्याला मंजुरी दिली. पशुवैद्यक संस्थांना जीवनरक्षक औषधाचा पुरवठा करण्यासाठी ५० लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, सभापती वर्षा धोपटे, दुर्गावती सरियाम, नंदा लोहबरे, वंदना पाल, सदस्य उकेश चव्हाण, मनोहर कुंभारे, विजय देशमुख, उज्वला बोढारे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)