शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

९०३ रुग्णांना मूतखड्यातून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

सुमेध वाघमारे नागपूर : असह्य वेदनादायी प्रकार म्हणजे ‘मूतखडा’ (किडनी स्टोन). नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाने आतापर्यंत ...

सुमेध वाघमारे

नागपूर : असह्य वेदनादायी प्रकार म्हणजे ‘मूतखडा’ (किडनी स्टोन). नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाने आतापर्यंत ९०३ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना मूतखड्यातून दिलासा दिला आहे. या विभागाने मागील पाच वर्षांत ३९२८ किरकोळ (मायनर) तर २६३३ गंभीर (मेजर) स्वरूपातील शस्त्रक्रिया केल्या. यामुळे विदर्भ, मराठवाडाच नाही तर आजूबाजूच्या तीन राज्यांच्या रुग्णांसाठी हा विभाग वरदान ठरला आहे.

एकीकडे हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब व स्थूलता याविषयी जागृती वाढत असल्याचे दिसत असतानाच, आपल्या संपूर्ण शरीराविषयी जाणून घेण्याची व शरीराची काळजी घेण्याविषयीची अनास्थाही तेवढीच आहे. ही अनास्थाच मूत्राशयाचे आजार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभागात मागील पाच वर्षांत दुपटीने रुग्ण वाढले आहेत. येथे विदर्भच नाही तर मराठवाडा, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. यात ‘किडनी स्टोन’, प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोगाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

-कोरोनाकाळातही शस्त्रक्रिया

‘सुपर’च्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर यांच्या मार्गदर्शनात २०१६ ते २०२० या कालावधीत २६३३ मेजर तर ३९२८ मायनर शस्त्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, कोरोनामुळे अनेक हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया बंद पडल्या होत्या. परंतु युरोलॉजी विभागात शस्त्रक्रिया अखंडित सुरू होत्या. २०२० मध्ये ९५५ मायनर, तर ५३५ मेजर शस्त्रक्रिया झाल्या.

-मूत्रपिंड कर्करोगाच्या ५८ रुग्णांवर शस्त्रक्रिया

मूत्रपिंडाचा कर्करोग (रेडिकल नेफ्रेक्टॉमी) झालेल्या ५८, मूत्राशयाचा कर्करोग (रेडिकल सिस्टेक्टॉमी) झालेल्या ३२, प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीला सुरुवात झालेल्या (बीईपी) ६८७ तर प्रोस्टेट ग्रंथी पूर्णत: वाढलेल्या (रेडिकल प्रोस्टेटेक्टॉमी) ९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील बहुसंख्य रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे.

-युरोलॉजी विभागात लवकरच ‘एमसीएच’ (फोटो घ्यावा)

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभागात केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर आजूबाजूच्या राज्यातूनही रुग्ण येतात. या विभागातील जुनी ‘एक्स्ट्रा कॉर्पोरीअल शॉकवेव्ह लिथोट्रीप्सी’ यंत्र कालबाह्य झाले आहे. त्या जागी नव्या यंत्राची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ते रुग्णसेवेत असेल. विशेष म्हणजे, येत्या काळात युरोलॉजी विभागात ‘एमसीएच’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल

-मूत्राशयाशी संबंधित रुग्ण वाढले (फोटो घ्यावा)

वेगवेगळ्या कारणाने होणारा मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार आहे. अलीकडे किडनी स्टोन, मूत्रपिंड, मूत्राशय व प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ‘लेप्रोस्कोपी’द्वारे होणाऱ्या येथील शस्त्रक्रियेमुळे रुग्णांसाठी हा विभाग वरदान ठरत आहे.

- डॉ. धनंजय सेलुकर, विभागप्रमुख, युरोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल