शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोवाडसह १३ गावांतील पूरग्रस्तांना दिलासा

By admin | Updated: August 14, 2014 01:20 IST

वर्धा नदीला १९९१ मध्ये आलेल्या पुरामुळे मोवाडसह १३ गावांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना घरे बांधणीसाठी शासनाने दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याज असे एकूण १४ कोटी ७५ लाख

अनिल देशमुख : घरावरील कर्ज आणि व्याज माफ, मंत्रिमंडळाचा निर्णयनागपूर : वर्धा नदीला १९९१ मध्ये आलेल्या पुरामुळे मोवाडसह १३ गावांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना घरे बांधणीसाठी शासनाने दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याज असे एकूण १४ कोटी ७५ लाख रुपये राज्य शासनाने माफ केले, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख देशमुख यांनी दिली. याबाबत मंत्रिमंडळापुढे ठेवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. यामुळे मोवाड भागातील नागरिकांना दिलासा मिळाला.वर्धा नदीला ३० जुलै १९९१ रोजी आलेल्या महापुरात मोवाड वाहून गेले. तर नरखेड तालुक्यातील इतर १३ गावे बाधित झाली. महापुरात २०४ नागरिकांना जलसमाधी मिळाली तर जनावरे वाहून गेली. घरांचे नुकसान झाले, नागरी सुविधा, शासकीय इमारतीचे नुकसान, व्यापारी, कारागिरांचे नुकसान तसेच शेतपिकांचेही प्रचंड नुकसान झाले. पूरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत, अस्थायी निवारा व बाधित गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने तत्कालीन तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २१ आॅगस्ट १९९१ रोजी नागपूर येथे बैठक घेण्यात आली. त्यात या विषयावर आराखडा, कृतीपर कार्यक्रम आणि निर्णय घेण्यात आले. त्यानुसार पूरग्रस्तांचे पुनर्वसन, बाधित पूरग्रस्त गावाचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसनाच्या ठिकाणी घरे, घरकुलाच्या बांधकामासह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुनर्वसनाच्या ठिकाणी शेतकरी कुटुंबाकरिता तीन हजार चौरस फूट जागेसह २५ हजार रुपये खर्चाची घरे बांधून देण्यात आली. यात १० हजार रुपये शासकीय अनुदान, १० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून तर पाच हजार रुपये कर्ज अशाप्रकारच्या खर्चातून ती घरकुले पूर्ण करण्यात आली. यासाठी शासनाचा काही निधी आणि काही कर्जपुरवठा करण्यात आला. पूरबाधित गावांचे पुनर्वसन झाले, त्या गावांमध्ये पुरेसा रोजगार नसल्याने आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे कर्ज आणि त्यावरील व्याजाची परतफेड होणे अशक्य होते. परिणामी कर्ज आणि व्याज माफ करण्याची मागणी ना. देशमुख यांनी शासनाकडे वारंवार केली होती. मुख्यमंत्र्यांसमोरही हा विषय ठेवला होता.सदर कर्ज वसूल करणे शक्य नसल्याने मुद्दल रक्कम आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा प्रस्ताव ना. देशमुख यांनी मंत्रिमंडळासमोर ठेवला. तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आला. त्यानुसार आता मोवाडसह इतर पुनर्वसित १३ गावातील नागरिकांवरील घरबांधणीचे कर्ज आणि त्यावरील व्याज पूर्णपणे माफ करण्यात आले. या निर्णयामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)