नागपूर : हार्मोनी इव्हेंट्सच्या वतीने ‘रेखा एक ख्वाब’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजेश समर्थ व स्वस्तिका ठाकूर यांच्या उपस्थितीत राजेश दुरुगकर, पलक आर्या व प्रिया देशकर यांनी विविध गाणी सादर केली. निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले. कीबाेर्डवर विक्रम लिमजे, ढोलकवर कृष्णा जनवारे, तबल्यावर कृणाल दहेकर, साईड रिदमवर राजेश धामणकर, ऑक्टोपॅडवर उल्हास चितमुलवार यांनी साथ दिली.
.........