शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करून बलात्कार अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: October 29, 2015 03:18 IST

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहित महिलेची फसवणूक करून बलात्कार केल्याप्रकरणी ...

नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहित महिलेची फसवणूक करून बलात्कार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. शेख हाफीज शेख मजीद (३३), असे आरोपीचे नाव असून तो ताजनगर येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, पीडित महिला ही ३० वर्षांची आहे. ती आपले पती आणि मुलासोबत वैवाहिक जीवन जगत असताना तिच्यावर हाफीज शेख याची वाईट नजर होती. त्याने या पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन अस्तित्वात असलेल्या पतीपासून तिचा तलाक घडवून आणला होता. त्यानंतर तिच्याशी निकाह केल्याचा बनावट निकाहनामा तयार केला होता. हा निकाहनामा खरा असल्याचे भासवून त्याने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे ती तीन महिन्यांची गरोदरही होती. ही बाब हाफीज शेख याला समजताच त्याने पीडित महिलेस पत्नी म्हणून ठेवण्यास नकार दिला होता. आरोपी हाफीजच्या या बनवाबनवीमुळे ती आपल्या पहिल्या पतीपासून दुरावली होती , या शिवाय तिचे संपूर्ण आयुष्यच बर्बाद झाले होते. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी १७ आॅक्टोबर २०१५ रोजी शेख हाफीज याच्याविरुद्ध भादंविच्या ४२०, ३७६, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. अटक टाळण्यासाठी त्याने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने मुख्य अतिरिक्त सरकारी वकील नितीन तेलगोटे, फिर्यादी पीडित महिलेच्या वतीने अ‍ॅड. लुबेश मेश्राम तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सलीम खान यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)