शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक ॲपवर पिकांची नाेंदणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : महसूल विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या सहकार्याने जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख पुणेअंतर्गत टाटा समूहाच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : महसूल विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या सहकार्याने जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख पुणेअंतर्गत टाटा समूहाच्या सहकार्याने ई-पीक पाहणी या मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली. शेतकऱ्यांनाे, माेबाईल ॲप ‘ई-पीक’वर पिकांची नाेंदणी करा, पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी केले.

नरखेड पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयाेजित ई-पीक पाहणी ॲप कार्यशाळेत त्यांनी संवाद साधला. यावेळी तहसीलदार डी. जी. जाधव, पं. स. सभापती नीलिमा रेवतकर, माजी कृषी सभापती सतीश शिंदे, पं. स. सदस्य मयूर उमरकर, सुभाष पाटील, माजी उपसभापती वैभव दळवी, सतीश रेवतकर, नायब तहसीलदार विजय डांगाेरे, भागवत पाटील उपस्थित हाेते.

यापूर्वी पीक पाहणी परंपरागत पद्धतीने हाेत असे. प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि शेतकऱ्यांची पाहणी यामध्ये तफावत निर्माण होत होती. परंतु आता शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी अ‍ॅपवर करणार. ही नोंदणी अचूक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अचूक अंदाज व्यक्त करणे शक्य होणार आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकरी पिकांची माहिती व नोंदी, तलाठी तपासून घेतील. त्यामुळे पारदर्शकता येणार असल्याचे श्रीकांत उंबरकर यांनी यावेळी सांगितले. १५ आ‍ॅगस्टपासून या प्रकल्पाची सुरुवात होत असून, या अ‍ॅपद्वारे आपल्या शेतातील पीक पेरा शेतकऱ्यांनीच स्वतः भरून घ्यायचा आहे. हे अ‍ॅप मराठीमध्ये असून, वापरण्यास सोपे आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, सर्व शेतकऱ्यांनी यशस्वी करावा, असे आवाहन तहसीलदार डी. जी. जाधव यांनी यावेळी केले. कार्यशाळेला मंडळ अधिकारी विनय यावलकर, गुणवंता धवड, नीलेश मिश्रा, दयानंद कुमरे, मिलिंद चावले व शेतकरी उपस्थित हाेते.

120821\img_20210812_162520.jpg

ई अँप कार्यशाळेत माहिती देताना उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर व तहसीलदार डी जी जाधव