शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांच्या बाबतीत नागपुरकर ‘बेपर्वा’ , साडेपाच वर्षात 20 लाखांहून अधिक नागरिकांनी तोडले नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 21:41 IST

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

नागपूर, दि. 23 - नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या साडेपाच वर्षांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी २० लाखांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली. विशेष म्हणजे हे प्रमाण वाढत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात २०१२ पासून किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती पोलीस हेल्मेट न घालता सापडले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१२ ते ३० जून २०१७ या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी २० लाख ५८ हजार ६५७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. सर्वाधिक कारवाई २०१६ साली करण्यात आली. या वर्षात ५ लाख १५ हजार ३७० नागरिकांना दंड ठोठावण्यात आला तर २०१७ मधील पहिल्या ६ महिन्यातच ३ लाख ३ हजार ७५५ नागरिकांवर कारवाई झाली. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचे प्रमाण वाढतच जात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. साडेपाच वर्षांच्या कालावधीत नागरिकांकडून २९ कोटी २५ लाख १४ हजार ९६२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील गाडी चालवून नियमांचे उल्लंघन करणा-या ११ हजार ७५ महाभागांवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे नियम तोडणाºयांविरोधातील कारवाईमध्ये सातत्याने वाढच होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. २०१५ मध्ये १९८१ जणांवर कारवाई झाली तर २०१६ मध्ये हाच आकडा १६७८ इतका होता. २०१७ मधील पहिल्या ६ महिन्यांत २,२०२ नागरिक कचाट्यात सापडले.