शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

मिहानसाठी संपादित जमिनीचा मोबदला वाढविण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी संपादित मौजा तेल्हारा येथील जमिनीचा मोबदला वाढविण्यास नकार देऊन ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी संपादित मौजा तेल्हारा येथील जमिनीचा मोबदला वाढविण्यास नकार देऊन शेतकऱ्याचे अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला.

सुभाष मस्के असे शेतकऱ्याचे नाव असून, मिहान प्रकल्पाकरिता त्यांची मौजा तेल्हारा येथील ३ हेक्टर ९० आर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात ८ जून २००७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भूसंपादन अधिकाऱ्याने २८ जून २०१० रोजी त्यांना सहा लाख रुपये प्रति हेक्टर मोबदला मंजूर केला होता. मस्के यांनी त्यावर समाधान न झाल्यामुळे मोबदला वाढवून मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. ७ डिसेंबर २०१५ रोजी दिवाणी न्यायालयाने त्यांना १८ लाख रुपये प्रति हेक्टर मोबदला मंजूर केला. जमीन महानगरपालिका सीमेलगत व महामार्गाजवळ असल्यामुळे त्यांना मोबदला वाढवून देण्यात आला. परंतु, मस्के यांचे त्यावरही समाधान झाले नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रति हेक्टर एक कोटी रुपये मोबदला मिळण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी मौजा खापरी रेल्वे, मौजा खडका, मौजा जामठा व मौजा चिचभवन येथील जमिनीची विक्रीपत्रे सादर केली होती. उच्च न्यायालयाने ही चारही गावे तेल्हारापासून लांब असल्यामुळे संबंधित विक्रीपत्रे मस्के यांच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यास लागू होत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, याशिवाय अन्य ठोस पुरावे रेकॉर्डवर नसल्याचे सांगून दिवाणी न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.