शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात घट

By admin | Updated: August 15, 2015 03:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा शुल्क फार जास्त असल्याची वारंवार टीका करण्यात येते.

नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांना ‘ई-मेल’वर मिळणार उत्तरपत्रिकांची प्रतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा शुल्क फार जास्त असल्याची वारंवार टीका करण्यात येते. विशेषत: एखाद्या पेपरमध्ये जरी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी त्याला पूर्ण परीक्षा शुल्क भरावे लागते व नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन विद्यापीठाने पुरवणी परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात २१ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे.या प्रस्तावानुसार पुरवणी परीक्षेसाठी एकूण परीक्षा शुल्काच्या २५ ते ३० टक्के रक्कमच विद्यार्थ्यांकडून घेण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. परंतु विषयनिहाय किंवा पेपरनिहाय परीक्षा शुल्क घेण्यात यावे, असे अनेक सदस्यांचे मत आहे. त्यामुळे नेमके शुल्क किती असावे, याबाबत विद्वत परिषदेत सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. दरम्यान, प्राधिकरणे ३१ आॅगस्ट रोजी बरखास्त होणार असल्याने विद्यापीठात बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. २१ आॅगस्ट रोजी विद्वत परिषदेची बैठक झाल्यानंतर २६ आॅगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे.(प्रतिनिधी)फेरमूल्यांकन प्रक्रिया होणार वेगवानहिवाळी परीक्षेपासून फेरमूल्यांकनाची प्रक्रिया वेगवान होणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. नोंदणी अर्ज भरताना ‘एमकेसीएल’ कडून विद्यार्थ्यांचे ‘ई-मेल’ तसेच मोबाईल क्रमांक घेण्यात येत आहेत. यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच होणार आहेत. विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना ‘स्कॅन’ झालेल्या उत्तरपत्रिकेची प्रत लगेच त्यांच्या ‘ई-मेल’वर पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गुणपत्रिका लवकरच देणारनिकाल लागून पंधरवडा ओलांडल्यावर अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. कोऱ्या गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या हातात काही गुणपत्रिका पडत नसल्याची बाब समोर आली. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. परंतु आता अंतिम वर्षाच्या सर्व गुणपत्रिका ‘प्रिंटिंग’ला गेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिले अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकांना प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतरच उर्वरित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.