शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पाठीवरील ओझे कमी करा

By admin | Updated: October 28, 2015 03:21 IST

कष्टकरी माथाडी कामगार हा नेहमीच उपेक्षितही राहिला आहे. तो वर्षभर पाठीवर ओझे वाहतो.

माथाडी कामगारांची मागणी : वर्षभर मिळावे काम नागपूर : कष्टकरी माथाडी कामगार हा नेहमीच उपेक्षितही राहिला आहे. तो वर्षभर पाठीवर ओझे वाहतो. दिवसरात्र राबतो. मात्र त्याच्या या कष्टाला कधीच योग्य मोल मिळालेले नाही. त्याच्या कामाला प्रतिष्ठा नाही. मान-सन्मान नाही. कुणी दोन चांगले शब्दसुद्धा बोलत नाही. उलट त्याच्या पाठीवर स्वत:च्या वजनापेक्षा दुप्पट म्हणजे, शंभर-सव्वाशे किलोचे ओझे दिल्या जाते. हा क्रूरपणा थांबविण्यासाठी मागील ४० वर्षांपासून तो संघर्ष करीत आहे. परंतु अद्याप त्यात त्याला यश मिळालेले नाही. आजही कृषी उत्पन्न बाजार समित्या व खासगी बाजारात या कामगारांच्या पाठीवर शंभर-सव्वाशे किलोचे ओझे लादल्या जाते. मागील वर्षानुवर्षांपासून सुरू असलेला हा क्रूरपणा कधी थांबणार! असा सवाल महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’च्या मंचावर उपस्थित केला. माथाडी कामगार नेते बाबा आढाव यांनी कष्टकरी कामगारांच्या संरक्षणासाठी गत १९७४ मध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, ही संघटना उभी केली. या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विखुरलेला कष्टकरी कामगार एकजूट करण्यात आला. त्यातून आज या संघटनेशी राज्यभरातील दोन लाखांपेक्षा अधिक कष्टकरी कामगार जुळले आहेत. ही संघटना मागील ४० वर्षांपासून या माथाडी कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे. सरकारने या घटकाला संरक्षण देण्यासाठी मागील १९६९ मध्ये ‘माथाडी कामगार कायदा’ तयार केला. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, तो संपूर्ण राज्यात लागू होण्यासाठी ४० वर्षांचा काळ लागला. आज हा कायदा संपूर्ण राज्यात पोहोचला. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी कुठेही होताना दिसून येत नाही. माथाडी कामगारांचा राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताच भार नाही. त्यांच्या मजुरीतून कपात करण्यात येणाऱ्या ३० टक्के लेव्हीतूनच त्याला सोयी-सुविधा दिल्या जातात. मग असे असताना, हा घटक उपेक्षित का? असा प्रश्न यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. हरीश धुरट यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, माथाडी कामगार हा नेहमीच शोषित राहिला आहे. कधी भांडवलदार तर ठेकेदारांनी या वर्गाचे नेहमीच शोषण केले आहे. या चर्चेत डॉ. हरीश धुरट यांच्यासह राहुल वेळे, मणिराम रडके, हरिभाऊ कावळे, हरी चटप, कुशन राऊत, सुनीता शाहू, कौशल्या शाहू, मुद्रिकाप्रसाद पाठक व देवराव आंबटकर यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)