शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांदे महाग, पांढरे कांदे व बटाटे स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

नागपूर : दहा दिवसापूर्वी कळमना ठोक बाजारात २५ रुपये किलोपर्यंत कमी झालेले लाल कांद्याचे भाव आता दर्जानुसार ३५ ते ...

नागपूर : दहा दिवसापूर्वी कळमना ठोक बाजारात २५ रुपये किलोपर्यंत कमी झालेले लाल कांद्याचे भाव आता दर्जानुसार ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत. याउलट पांढऱ्या कांंदे २० ते २२ रुपये किलोपर्यंत कमी झाले आहेत. नाशिकमध्ये लाल कांद्याचे पीक निघण्यास उशीर झाल्याने राज्यात सर्वत्र भाव वाढले आहेत. त्यामुळे लोक पांढऱ्या कांद्याची जास्त खरेदी करीत आहेत. त्यातच कळमन्यात बटाटे दर्जानुसार ७ ते १२ रुपये किलो आहेत.

ठोक बाजारातील भावानुसार किरकोळमध्ये लाल कांदे ५० रुपये किलो तर पांढरे कांदे ३५ ते ४० रुपये किलो विक्रीस आहेत. याशिवाय ठोकमध्ये बटाटे ७ ते १२ रुपये किलो असतानाही किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकांना महागाईचा अनुभव येत आहे.

लाल कांद्याचे दर लवकरच कमी होणार

कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, दहा दिवसापूर्वी आटोक्यात असलेले लाल कांद्याचे भाव आवकीअभावी वाढले आहेत. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात पुढील दोन आठवड्यात पीक निघाल्यानंतर भाव कमी होतील. पण आता भाव जास्त आहेत. कळमन्यात नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून माल येत आहे. दररोज ९ ते १० ट्रकची (एक ट्रक दहा टन) आवक आहे. याशिवाय पांढऱ्या कांद्याची आवक गुजरात राज्याच्या महुआ आणि भावनगर येथून आहे. दररोज ८ ते १० ट्रक (एक ट्रक २५ टन) कळमन्यात येत आहेत. महाराष्ट्र वगळता पांढरे कांदे देशात अन्य राज्यात फार कमी विकले जातात. पण आता लाल कांदे महाग झाल्याने सर्वच राज्यात पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली आहे. यंदा गुजरात राज्यात पांढऱ्या कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आले असून, येथून सर्वच राज्यात विक्रीसाठी जात असल्याचे वसानी यांनी सांगितले.

यंदा बटाट्याचे बम्पर पीक

गेल्यावर्षी पावसामुळे बटाटे पिकाला फटका बसल्यानंतर जानेवारीत भाव ठोकमध्ये ४० रुपये तर किरकोळमध्ये ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे उत्तर प्रदेशात बम्पर पीक आले आहे. कळमन्यात दररोज प्रयागराज, कानपूर आणि आग्रा येथून २० ट्रकची आवक आहे. किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो भाव आहेत. नवीन बटाटे लवकर शिजत नसल्याच्या गृहिणींच्या तक्रारी आहेत.

लसणाचे भाव उतरले

कळमना ठोक बाजारात दहा दिवसापूर्वी दर्जानुसार १०० ते १२५ रुपयांवर गेलेले लसणाचे भाव आता आवक वाढल्याने ७५ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. किरकोळमध्ये २०० रुपयांवर पोहोचलेल्या लसणाचे भाव किरकोळमध्ये १२५ ते १४० रुपये किलो आहेत. यावर्षी लसणाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्याचा परिणाम म्हणून सध्या बाजारात आवक वाढली आहे. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पीक निघाले आहे. जावरा, मनसोर, छिंदवाडा येथून दररोज चार ते पाच ट्रकची (एक ट्रक दहा टन) आवक आहे. लसणासोबतच अद्रकाचे भाव कमी झाले असून, किरकोळमध्ये ४० रुपये किलो भाव आहे. कळमन्यात दररोज छिंदवाडा, औरंगाबाद आणि केरळ येथून तीन ते चार ट्रक येत आहेत.