शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विद्यापीठांमध्ये लवकरच प्राध्यापक भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीची मागणी जोर धरते आहे. या भरतीसाठी शासन प्रयत्न करीत असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीची मागणी जोर धरते आहे. या भरतीसाठी शासन प्रयत्न करीत असून वित्त विभागानेदेखील मंजुरी दिली आहे. लवकरच प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

प्राध्यापक भरतीसंदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने मान्यता दिलेली सर्व प्राध्यापकांची पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्यात सहायक प्राध्यापकांची १५ हजारांहून पदे रिक्त आहेत. अगोदरचे युती सरकार व आताचे महाविकास आघाडी सरकारमध्येदेखील भरती प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. नेट-सेट पात्रताधारक तसेच पीएचडी झालेल्या उमेदवारांकडून भरतीसंदर्भात मागणी होत आहे. प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कायमच सकारात्मक आहे. वित्त मंत्रालयाच्या मान्यतेनंतर प्राध्यापक भरतीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने पदांना मंजुरी दिली असून, त्यांच्या सूचनेनुसार प्राध्यापक भरती लवकरच सुरू होईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची परीक्षा जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.