शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रवेशासाठी चुकीच्या पत्त्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST

रियाज अहमद नागपूर : आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांकडून चुकीचे रहिवासी पत्ते नोंदविले जात आहेत. यासंदर्भात लोकमतला आलेल्या ...

रियाज अहमद

नागपूर : आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांकडून चुकीचे रहिवासी पत्ते नोंदविले जात आहेत. यासंदर्भात लोकमतला आलेल्या तक्रारीवरून काही रहिवासी दाखल्यांची तपासणी केली असता तिथे लाभार्थ्यांचे अस्तित्वच दिसून आले नाही.

आरटीई प्रवेशासाठी नियमानुसार पालकाचे निवासस्थान शाळेपासून १ किलोमीटरच्या आत असणे गरजेचे आहे. पण काही पालक नामांकित शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून शाळेच्यापासून १ किलोमीटरच्या आतील रहिवासी दाखले जोडतात. गेल्यावर्षीपर्यंत हा प्रकार सर्रास सुरू होता. परंतु उच्च न्यायालयाने या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी आरटीई तपासणी समिती गठित केली. या समितीचे सदस्य व आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहीद शरीफ यांच्याकडे काही पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. लोकमतच्या टीमला ही माहिती मिळाली. टीमने पालकांचे दस्तावेज तपासले व समितीच्या सदस्यांसोबत रहिवासी दाखल्याच्या ठिकाणी भेट दिली. दस्तावेजानुसार एका पालकाने आपला पत्ता सिव्हिल लाईन्स लिहिला होता. परंतु त्या पत्त्यावर कुणीच सापडले नाही. नंतर माहिती झाले की तो पालक गांधीबागमध्ये राहतो. अशाच प्रकारे एका अन्य पालकाने प्रवेशासाठी चिंचभवनचा पत्ता नोंदविला आहे. परंतु या पत्त्यावर भेट दिली असता, एक मोडकळीस आलेली इमारत होती. तिथे कुणाचेही निवासस्थान नव्हते. हा पालक सोनेगाव येथे राहत असल्याचे नंतर माहिती पडले.

न्यायालयापुढे ठेवू प्रकरणे

आरटीई तपासणी समितीचे सदस्य व अ‍ॅक्शन कमिटीचे चेअरमन शाहीद शरीफ म्हणाले की, अशा प्रकरणांना आम्ही न्यायालयापुढे ठेवू. ते म्हणाले की, आरटीई प्रवेशासाठी बोगस दाखले तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे गरजवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.