शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या सभेसाठी मौदा सज्ज

By admin | Updated: August 21, 2014 01:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मौदा एनटीपीसी वीज प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रशेखर बावनकुळे : वॉटर प्रूफ शामियाना उभारलामौदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मौदा एनटीपीसी वीज प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघाचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी मौदा एनटीपीसी परिसर सज्ज असून स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि स्थानिक पोलिसांनी बुधवारी मॉकड्रील केली.जाहीर सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. कृपाल तुमाने उपस्थित राहतील. जाहीर सभेसाठी नगारिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. जाहीर सभेसाठी येताना वाहनधारकांनी बाबदेव साखर कारखाना आणि मौदा एनटीपीसी प्रकल्पालगतच्या मैदानात वाहन पार्किंग करावी, गैरसोय आणि गर्दी टाळण्यासाठी किमान एक तास आधी जागा राखून घ्यावी, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ. बावनकुळे यांनी केले. पोलीस प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या असून त्याचे पालन करावे. कार्यक्रमस्थळी बॅग, पिशवी, कॅमेरा, बॉटल आदी साहित्य आणण्यावर बंदी असल्याचे कळविले आहे. मौदा एनटीपीसी प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला गती मिळाली. प्रकल्पाने बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पुरेसा मोबदला मिळवून देण्याचा आपण प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पात टप्प्याटप्प्याने नोकरीत सामावून घेण्यात येत असून कुशल, अकुशल, तांत्रिक आणि तंत्रज्ञ प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येत आहे. प्रकल्पबाधित कुंभारी, धामणगाव, आजनगाव, कुंभारगाव आणि कुंभापूर या गावांचेन पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासन-एटीपीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रसगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री गोयल यांच्याशी भेटून मार्ग काढू, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)