शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आरसी’ पुन्हा होणार ‘स्मार्ट’

By admin | Updated: April 18, 2017 02:21 IST

राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना, ...

पेपर आरसीची कटकट संपणार : दोन वर्षांनंतर सेवा पुरवठादाराची नेमणूकनागपूर : राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना, वाहनांचे नोंदणी पुस्तक (आरसी बुक) तब्बल दोन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे. मात्र आता हे लवकरच संपुष्टात येणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने पुन्हा ‘आरसी’ला ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप देण्याचा निर्णय घेतला असून, ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ या कंपनीला हे कंत्राट दिले आहे. परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बूक’ला २००६ मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. या ‘कार्ड’च्या पुरवठ्यासाठी ‘शाँग’ या खासगी कंपनीशी करार केला होता. जून २०१४ मध्ये कंपनीचे कंत्राट संपले. विभागाने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु यादरम्यान नव्या कंपनीला कंत्राट किंवा यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना जुन्या स्वरूपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. विशेष म्हणजे, आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी कागदाचा (प्री प्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने प्रलंबित आरसीची समस्या वाढली होती. यातच आरसी बाळगताना कागदापेक्षा स्मार्ट कार्ड सोयीस्कर आणि कागदाच्या तुलनेत टिकाऊ असल्याने नागरिकांकडून कागदाच्या आरसीबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन विभागाने पुन्हा ‘स्मार्ट आरसी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.(प्रतिनिधी)दोन वर्षांसाठी पुरवठादाराची नेमणूकपरिवहन विभागाने ‘आरसी’चे ‘स्मार्ट कार्ड’ बनविण्याचे काम ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ कंपनीला दिले असून, त्यासंबंधीचा करारही केला आहे. कंपनीला प्रति स्मार्ट कार्डमधून ५४ रुपये ७२ पैसे मिळतील; शिवाय कंपनीला वाहन १.० प्रणालीमधून वाहन ४.० प्रणालीमध्ये डेटा रूपांतरित करावा लागणार आहे. पेपर आरसीलाही मिळणार ‘स्मार्ट कार्ड’गेल्या दोन वर्षांपासून वाहनधारकांना ‘पेपर आरसी’ दिली जात आहे. मात्र, आता सेवा पुरवठादार नेमण्यात आल्याने ज्यांच्याकडे पेपर आरसी आहे आणि त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ हवे असेल तर त्यासाठीचे शुल्क ‘आरटीओ’कडे भरून त्यांना ते दिले जाणार आहे, अशी माहिती आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.