झुंबा डान्सवर थिरकणारा युवतींचा जत्था...सुबक मेंदीने रंगलेले हात...कुठे क्रिकेटचा खेळ तर कुठे दोरीवरच्या उड्या आणि गीतांचे सादरीकरण करीत लोकमत धमाल गल्लीत सर्व वयोगटातल्या नागरिकांनी धम्माल मस्ती करीत रविवारची सकाळ ‘फुल्ल टू धमाल...एन्जॉय’ केली. हा कार्यक्रम सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या स्पोर्टस् ग्राऊंडवर आयोजित करण्यात आला. लोकमतच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत नागपूरकरांनी रविवारची सकाळ अनोख्या पद्धतीने साजरी केली. प्रामुख्याने युवावर्गाने नृत्य आणि गायनाचा आनंद घेत रस्सीखेच, सायकलिंगचीही मजा घेतली. तर बच्चेकंपनी एअर प्लेट, जादूचे प्रयोग आणि क्ले मॉडेलिंगमध्ये रंगली होती. सेल्फी घेण्याची तर येथे स्पर्धाच लागली होती. तब्बल तीन तास नागपूरकर धम्माल मस्ती करण्याचा आनंद घेत होते.
रॉ किं ग नागपूर
By admin | Updated: May 11, 2015 02:14 IST