शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

लग्नास नकार देणाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - लग्न करण्याची थाप मारून सहा महिन्यांपासून इकडे तिकडे फिरविणाऱ्या तरुणाने आता लग्नास स्पष्ट नकार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - लग्न करण्याची थाप मारून सहा महिन्यांपासून इकडे तिकडे फिरविणाऱ्या तरुणाने आता लग्नास स्पष्ट नकार दिल्यामुळे तरुणीने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. बेलतरोडी पोलिसांनी या प्रकरणी एका बार व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.

जयदीप किशोर भगत (वय ३०) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो वर्धा मार्गावरील गावंडे ले-आऊटमध्ये राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, नातेवाईकांचा बीअर बार चालविणारा भगत डिसेंबर २०२० मध्ये तक्रार करणाऱ्या तरुणीला बघण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी मध्यस्थांमार्फत त्याची ओळख झाली. एकमेकांना पसंत करण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांच्यातील घसट वाढली. तरुणीच्या तक्रारीनुसार, २१ डिसेंबर २०२० पासून तो तिला इकडे तिकडे फिरायला नेऊ लागला. मनीषनगरातील एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. बाहेरगावीही अनेक ठिकाणी हा प्रकार झाला. आता त्याचे मन भरले की काय, कळायला मार्ग नाही. भगतने लग्नास नकार दिला आहे. मध्यस्थांकडे हा प्रकार गेल्यानंतर त्यांनीही त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याची नकारघंटा कायम आहे. त्यामुळे तरुणीने बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेऊन भगतविरुद्ध बलात्काराचा आरोप लावणारी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---