शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

पेट्रोल पंप बंदची अफवा!

By admin | Updated: July 1, 2014 01:00 IST

पेट्रोल पंप बंद होण्याच्या अफवेने आज शहरात सर्वच पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. अनेकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोलची खरेदी केली. बहुतांश पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड

बहुतांश पंप कोरडे : एचपीच्या पंपावर दुपारपासून पुरवठानागपूर :पेट्रोल पंप बंद होण्याच्या अफवेने आज शहरात सर्वच पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. अनेकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोलची खरेदी केली. बहुतांश पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड झळकल्याने ग्राहकांची अडचण झाली. स्टॉक नसल्याने हिंदुस्थान पेट्रोलियमचे बहुतांश पंप गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. सोमवार सकाळपासूनच पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्याने ग्राहकांनी मिळेल त्या पंपावर वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी केले. त्यामुळे शहरात पेट्रोलची टंचाई होती. एचपीच्या पंपावर दुपारपासून पेट्रोलचा पुरवठा सुरू झाला आहे. शहरात मुबलक पेट्रोल असून ग्राहकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी करू नये, असे आवाहन विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने केले आहे. सर्वच पंपांवर मुबलक साठाहिंदुस्थान पेट्रोलियमच्या जिल्ह्यातील सर्वच पंपावर पेट्रोलचा साठा असल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे डेपो व्यवस्थापक धरणे यांनी लोकमतशी बोलताना दिली. शुक्रवारी नागपुरात पोहोचण्याची अपेक्षा असलेली रेल्व रेक सोमवारी सकाळी आली. त्यामुळे कंपनीच्या पंपांवर पेट्रोल वेळेत पोहोचू शकले नाही. ज्या पंपावर पेट्रोल होते, त्यांनी दिवसभर विक्री केली. पुण्याच्या लोणी रेल्वे स्थानकावरून निघालेल्या गाडीने भुसावळ, बडनेरा आणि वर्धा येथे अतिरिक्त थांबा घेतला. त्यामुळे एका टँकरमध्ये ६५ ते ६७ हजार लिटरचा साठा असलेली ५० टॅन्करची रेक नागपुरात तीन दिवस उशिरा पोहोचली. नागपूर डेपोतून नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा पुरवठा होतो. या चार जिल्ह्यातील जवळपास ११० पंपांना दररोज २२५ ते २५० हजार लिटर पेट्रोलचा पुरवठा करण्यात येतो. सध्या डेपोत मुबलक साठा असल्याने ग्राहकांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे धरणे यांनी स्पष्ट केले. वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल भरू नकाविदर्भ पेट्रोलपंप डिलर असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी सांगितले की, मुंबईची रिफायनरी देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. नागपूर डेपोत मनमाड येथून येथून पुरवठा होतो, तर मनमाड येथे मुंबईहून पाईपलाईनने पेट्रोलचा पुरवठा करण्यात येतो. दोन दिवस एचपीच्या पंपांवर पेट्रोलची टंचाई होती तर काही दिवसानंतर भारत पेट्रोलियम आणि इंडियन पेट्रोलियमच्या रिफायनरी देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहिल्यास या कंपन्यांच्याही पंपावर ग्राहकांना काही दिवसांसाठी पेट्रोलचा तुटवडा जाणवेल. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल गाड्यांमध्ये भरू नये, असे आवाहन भाटिया यांनी केले. (प्रतिनिधी)