शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजकुमार बडोले पुन्हा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:47 IST

गेल्या काही महिन्यांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टीकेचे धनी ठरत असलेले सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

ठळक मुद्देहायकोर्टाचा धक्का : अतिक्रमणाची तपासणी करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही महिन्यांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टीकेचे धनी ठरत असलेले सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी राजकीय वजनाचा दुरुपयोग करून सडक अर्जुनी येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. या आरोपाची सत्यता तपासून त्यात तथ्य आढळून आल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. परिणामी बडोले यांना धक्का बसला आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तेजराम मुनेश्वर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील सर्वे क्र. १८२ ही झुडपी जंगलाची जमीन आहे. या जमिनीला लागून बडोले यांचा भूखंड आहे. बडोले यांनी या भूखंडावर घर बांधण्यासाठी झुडपी जंगलाच्या ०.०५ एचआर जमिनीवर अतिक्रमण केले. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. पण राजकीय वजनामुळे बडोले यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर येत्या चार आठवड्यांमध्ये जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचा व अतिक्रमण आढळून आल्यास पुढील तीन महिन्यांत कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला. संयुक्त मोजणी करणाºयांमध्ये जिल्हाधिकारी, सडक अर्जुनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी, याचिकाकर्ता व बडोले यांचा समावेश राहणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सचिन सांबरे तर, नगर पंचायततर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.