शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

निर्माणाधीन ‘रेल्वे ओव्हरब्रिज’ ठरला डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

मंगेश तलमले/चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क खात/रेवराल : मुंबई-नागपूर-काेलकाता रेल्वेमार्गावरील खात (ता. माैदा) गावाजवळ असलेल्या रेल्वे फटकाजवळील वाहतूक काेंडीची ...

मंगेश तलमले/चक्रधर गभणे

लाेकमत न्यूज नेटवर्क

खात/रेवराल : मुंबई-नागपूर-काेलकाता रेल्वेमार्गावरील खात (ता. माैदा) गावाजवळ असलेल्या रेल्वे फटकाजवळील वाहतूक काेंडीची समस्या साेडविण्यासाठी केंद्र सरकारचा रेल्वे विभाग आणि राज्य शासनाच्या वतीने ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या कामाला सुरुवात करण्यात आली. या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या कामाचा वेग अतिशय संथ असल्याने अडीच वर्षातही पूर्ण करण्यात आले नाही. परिणामी, येथून ये-जा करणारे वाहनचालकांना त्रास हाेत असल्याने ते वैतागले असून, दुसरीकडे या कामाचा दर्जा सुमार असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.

मुंबई-नागपूर-काेलकाता रेल्वेमार्ग रामटेक-खात-भंडारा मार्गाला छेदून जात असल्याने तसेच खात येथील रेल्वे फाटकाजवळ वाहतूक काेंडी हाेत असल्याने याठिकाणी ‘रेल्वे ओव्हरब्रिज’ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा मार्ग नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला जाेडला असल्याने रायपूरहून जबलपूरकडे जाणारी सर्व वाहने भंडारा-खात-रामटेक मार्गे याच मार्गावरून धावत असल्याने या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते.

या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या बांधकामाचे कंत्राट बंका कन्स्ट्रक्शन इंजिनिअर्स ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर, मुंबई नामक कंपनीला दिले आहे. त्यांना हे काम सुरुवात केल्यापासून दाेन वर्षात पूर्ण करावयाचे हाेते. शिवाय, बांधकाम पूर्ण झाल्यापासून नंतरची पाच वर्षे या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही त्यांच्यावर साेपविण्यात आली आहे. हे काम करताना कंत्राटदार कंपनीने याेग्य काळजी न घेतल्याने वळण रस्त्याची दैनावस्था झाली आहे.

वाहनांमुळे वळण रस्त्यावर माेठमाेठे खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. शिवाय, चिखलही तयार झाला आहे. चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात हाेत आहेत, तर खड्ड्यांमुळे मालकांना वाहनांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या बांधकामात वीज केंद्रातील ‘फ्लाय ॲश’चा वापर केला जात असल्याने काेरड्या दिवसात वाहनचालक व नागरिकांना ‘फ्लाय ॲश’चा त्रास सहन करावा लागताे.

या कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार दर्जाची आहे. याबाबत कंत्राटदार कंपनी व शासनाच्या अभियंत्यांशी अनेकदा चर्चा केली. परंतु, ही बाब कुणीही गांभीर्याने घेतली नाही. ते मनमर्जीने काम करीत असून, स्थानिकांना सहकार्य करायला तयार नाहीत. स्थानिक लाेकप्रतिनिधी व राजकीय पक्षाचे नेते या दर्जाकडे लक्ष देण्यास तयार नाही, असा आराेप ग्रामपंचायत सदस्य महेश गिरीपुंजे यांच्यासह या भागातील नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कुणीही प्रतिसाद दिला नाही.

...

अडीच वर्षात ५० टक्के काम पूर्ण

९०० मीटर लांबीच्या या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या निर्मितीसाठी शासनाने ४५ काेटी ८२ लाख रुपये मंजूर केले. या कामाला डिसेंबर २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली असून, ते दाेन वर्षात म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण करावयाचे हाेते. टाळेबंंदीमुळे सात ते आठ महिने बांधकाम बंद हाेते. वास्तवात, या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’चे आजवर पूर्ण केवळ ५० ते ५५ टक्के बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

.......

विना राॅयल्टी रेतीचा वापर

या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या कामासाठी वापरली जाणारी रेती ही विना राॅयल्टी असल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, याला जाणकार व्यक्तींनी खासगीत दुजाेरा दिला आहे. ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या वळणमार्गावरील खड्डे धाेकादायक बनल्याने मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे मत खातच्या सरपंच ज्याेती डहाके यांनी व्यक्त केले. खड्डे व चिखलामुळे आपण दुचाकीसह अनेकदा पडलाे असून, दुखापत झाल्याचे खात येथील दुकानदार नरेश तलमले यांनी सांगितले.

...

ट्रॅक्टर उलटला

रामटेकहून खात मार्गे भंडाऱ्याच्या दिशेने तांदळाची पाेती घेऊन जाणारा एमएच-४०/बी-०६४५ क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्राॅलीसह याच ‘रेल्वे ओव्हरब्रिज’जवळील वळणमार्गावर गुरुवारी (दि. २) सकाळी ९ वाजताच्या सुमारास उलटला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, तांदूळ व ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी असे अपघात वारंवार घडतात.

310821\1750191-img-20210831-wa0005.jpg

उड़ाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे फोटो