शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

वाघाच्या अधिवासावर दरोडा

By admin | Updated: November 18, 2015 03:02 IST

एकिकडे उपराजधानीला व्याघ्र राजधानीचा दर्जा मिळावा, येथील वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी आटापिटा केला जात असताना,...

सोलर कंपनीचा डाव : कशी होणार व्याघ्र राजधानी? जीवन रामावत नागपूरएकिकडे उपराजधानीला व्याघ्र राजधानीचा दर्जा मिळावा, येथील वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी आटापिटा केला जात असताना, एका खासगी सोलर कंपनीने नागपूरपासून काहीच अंतरावरील कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील वन जमीन (जंगल) आपल्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. विशेष म्हणजे, ते जंगल वाघासह अनेक वन्यप्राण्यांचे अधिवास आहे. त्यामुळे ती कंपनी वन जमिनीवर नव्हे, तर थेट वाघाच्या अधिवासावर दरोडा घालत असल्याच्या वन्यजीवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड, असे त्या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मागील १९९५ पासून येथे कार्यरत आहे. परंतु काहीच दिवसांपूर्वी कंपनीने आपला विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनीला अतिरिक्त जागेची गरज आहे. त्यानुसार कंपनीने वन विभागाकडे शेजारीच असलेली ८७.९७ हेक्टर वन जमिनीसाठी मागणी केली. माहिती सूत्रानुसार या ८७.९७ हेक्टर वन क्षेत्रामध्ये ५८.८६ हेक्टर राखीव वन, २७.१६ हेक्टर संरक्षित वन व १.९५ हेक्टर झुडपी जंगलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वन विभागाने कंपनीच्या त्या प्रस्तावावर अध्ययनासाठी यापूर्वी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने मागील २५ मार्च २०१५ ते १४ एप्रिल २०१५ दरम्यान संबंधित वनक्षेत्रात पहिला सर्वे केला. त्यानंतर समितीने २० एप्रिल २०१५ रोजी नागपूरचे तत्कालीन उपवनसंरक्षक भट यांच्याकडे अहवाल सादर केला. समितीने त्या अहवालात प्रस्तावित वन क्षेत्रात वाघ, चांदी अस्वल, मोर, माकड, जंगली कुत्री, मसन्या उद, चितळ, सांभर, नीलगाय, रानडुक्कर, भेडकी, हरीयल, घुबड व पिसा अशा विविध वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. परंतु असे असताना उपवनसंरक्षक भट यांनी त्या अहवालातील ‘वाघ’ वगळून २७ एप्रिल २०१५ रोजी मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्याकडे चुकीचा अहवाल पाठविला. त्यानंतर २८ सप्टेंबर २०१५ रोजी याच मुद्यावर वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप बाजोरिया यांनी प्रस्तावित वनक्षेत्रात वाघाचा अधिवास असून, संबंधित वन अधिकाऱ्याने अहवालात हेराफेरी केल्याकडे वनमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.वनअधिकाऱ्याची बनवाबनवी सन २०१४ च्या प्रगणनेनुसार बोर लँडस्केपमध्ये १२ वाघांची संख्या दाखविण्यात आली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या लँडस्केपचा अर्थ हा बोर क्षेत्रासह त्याला लागून असलेली नागपूर व वर्धा वन विभागाचे परिक्षेत्र असा होतो. त्या लँडस्केपमध्ये नागपूर वन विभागातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर व कोंढाळी हा भाग येतो मात्र असे असताना तत्कालीन उपवनसंरक्षक भट यांनी या क्षेत्रापासून बोर हे १५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्याने सदर क्षेत्र बोर लँडस्केपमध्ये येत नसल्याचा आपल्या अहवालात उल्लेख केला होता. शिवाय त्यांनी भारतीय वन्यजीव संस्थानव्दारे जारी केलेल्या कॉरिडोरची माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही, अशीही बतावणी केली होती. वास्तविक ती सर्व माहिती भारतीय वन्यजीव संस्थानच्या वेबसाईटवर नकाशासह उपलब्ध केली आहे.