शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क केळवद : हाेळीच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी माेहफुलाच्या दारूभट्टी आणि अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाडी टाकायला सुरुवात केली आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

केळवद : हाेळीच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी माेहफुलाच्या दारूभट्टी आणि अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाडी टाकायला सुरुवात केली आहे. त्यातच केळवद (ता. सावनेर) पाेलिसांनी नांदागाेमुख शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात एका महिलेसह अन्य तीन आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, एकूण २ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. २४) सकाळी ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

नांदागाेमुख शिवारात (ता. सावनेर) माेहफुलाची दारूभट्टी असून, तिथे दारू काढली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी बुधवारी सकाळी या शिवाराची पाहणी केली. मात्र, पाेलीस येत असल्याची कुणकुण लागल्यााने आराेपींनी भट्टीवरून लगेच पळ काढला. पाेलिसांनी धाड टाकली आणि तिथून २०० लीटर माेहफुलाची दारू, एमएच-४०/व्हीएन-४०५३ क्रमांकाची ॲक्टिव्हा, २०० लिटर माेहफुलाची दारू, माेहफुलाचा सडवा, ड्रम व इतर साहित्य जप्त करून ॲक्टिव्हा वगळता संपूर्ण साहित्य घटनास्थळीच नष्ट केले.

या कारवाईमध्ये एकूण २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय, दिलीप संताेष राजपूत, अमित चंद्रपाल राजपूत, दिनेश दिलीप राजपूत सर्व रा. तिडंगी, ता. सावनेर यांच्यासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. येथील दारू नागपूर शहरासह इतर गावांमध्ये विक्रीला पाठविली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड, रवींद्र चटप, अमरदीप कामठे, श्रीधर कुळकर्णी, अश्विनी निकोसे, गुणवंता डाखोले, देवा देवकाते यांच्या पथकाने केली.