शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रफींच्या गीतात रंगलेला ‘यादे फिर रफी..’

By admin | Updated: August 4, 2014 00:56 IST

रफी साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम नागपुरात कुठेही असो, प्रेक्षकांची गर्दी ठरलेलीच. त्यात जुन्याजाणत्या गायकांचे सादरीकरण म्हटल्यावर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. डॉ. देशपांडे सभागृहात

राजू व्यास व योगेश शर्मा यांचे आयोजन : मो. मुनाफ यांची संकल्पना नागपूर : रफी साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम नागपुरात कुठेही असो, प्रेक्षकांची गर्दी ठरलेलीच. त्यात जुन्याजाणत्या गायकांचे सादरीकरण म्हटल्यावर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. डॉ. देशपांडे सभागृहात आज याची प्रचिती आली. रसिकांनी भरगच्च भरलेल्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, रफी साहेबांची गीते, वादकांची उत्कृष्ट साथ आणि गायकांचे तयारीचे सादरीकरण असा कार्यक्रम रंगला. राजू व्यास आणि योगेश शर्मा यांनी ‘यादे फिर रफी...’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची संकल्पना गायक मो. मुनाफ यांची होती. या कार्यक्रमाचे प्रायोजक न्यू मेट्रो सिटी लँड डेव्हलपर्स, महेश आॅप्टीकल्स, नवरतन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मंगलदीप बँड, एमको ट्रेडिंग कंपनी आणि श्रीलक्ष्मी आईसक्रीम पार्लर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अकिल अहमद, महेश गुप्ता, संजयसिंग दीक्षित, लहानुजी इंगळे, महेश चाकणकर, मनीष निखाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गीतांचा सिलसिला रंगतदार ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध सेक्सोफोन आणि बासरीवादक प्रकाश खंडाळे गुलाबी आँखे जो तेरी देखी... हे गीत सेक्सोफोनवर सादर करून माहोल केला. बऱ्याच दिवसांनी प्रकाश खंडारे यांना ऐकण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळाली. त्यानंतर रफींच्या एकापेक्षा सरस गीतांनी रसिकांचा ताबा घेतला. यात मो. मुनाफ, नीलु मुनाफ, मुमताज खान, श्रुती चौधरी, राजू व्यास, मृणाल लगदे, प्रसन्न जोशी, साजीद कुरेशी, याकूब फजल, वीरेंद्र कोरडे, जमील शेख या गायकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात ‘आया रे खिलौनेवाला ..., तेरे नैनो से मे दीप..., लखनउ की सरजमी.., अकेले है चले आओ..., दिवाने है दिवानो को..., ओ नन्हे से फरिश्ते.., सात अजुबे इस दुनिया मे..., नजर ना लग जाए.., दिल ने फिर याद किया...चल कही दूर निकल जाए...’ आदी एकूण ३० गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन महेश तिवारी यांनी केले. प्रत्येकच गीताला वन्समोअरची दाद मिळत असल्याने आयोजकांपुढेही पेच निर्माण झाला. त्यात फर्माईशींचीही बरसात होती. पण एकूणच कार्यक्रम रसिकांना आनंद देणारा ठरला. यात गायकांना विविध वाद्यांवर पवन मानवटकर, नागेश गेडाम, प्रकाश खंडारे, प्रकाश चव्हाण, नितीन, राजु ठाकूर, संजय बारापात्रे, राजेश धामणकर, प्रशांत नागमोते यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)