शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गरिब रूग्णांनाही मिळणार रेडिऑलॉजी सुविधा

By admin | Updated: August 23, 2014 02:05 IST

विदर्भातील विविध जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयांमध्ये किरणोपयोजन चिकित्सा केंद्र विकसित करण्यात येत आहे.

नीलेश शहाकार / बुलडाणा ग्रामीण व शहरी भागातील अनेक रुग्ण असाध्य आजाराने पिडीत असतात. त्या रुग्णांच्या आजाराचे वेळीच निदान होत नाही. खासगी रुग्णालयामधील उपचार त्यांच्या आवाक्याबाहेर असतात. यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक तणावात जीवन व्यतित करावे लागते. त्यापृष्ठभूमिवर अल्पदरात आरोग्य चिकित्सा सेवा देण्यासाठी विदर्भातील विविध जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयांमध्ये किरणोपयोजन चिकित्सा केंद्र विकसित करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे भागीदारी तत्त्वावर उच्च गुणवत्तेची व गरिबांना परवडण्याजोगी चिकित्सा सेवा देण्यासाठी ३५ जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. यात २४ जिल्हा सामान्य रुग्णालय, ६ महिला रुग्णालय, ४ सामान्य रुग्णालय तसेच १ केंद्रीय रुग्णालयाचा समावेश आहे. या किरणोपयोजन केंद्रातून क्ष-किरण, युएसजी, मॅमोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय या सुविधा अल्पदरात पुरविल्या जाणार आहे. खाजगी रुग्णालय किंवा रेडिओलॉजी लॅबोरेटरीतून उपचारासाठी मोठा खर्च आकारला जातो. त्यामुळे सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याशिवाय गरिबांना पर्याय राहत नाही. सरकारी जिल्हा रुग्णालये ही ग्रामीण आणि शहरी भागातल्या गोरगरीबांची जीवनदायीनीच असतात. ही रुग्णालये सुसज्ज व्हायलाच हवीत. म्हणून सरकारी रुग्णालयात, त्या परिसरात किंवा रुग्णालयाच्या जवळपासच्या जागेत ही चिकित्सा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर विशेष प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी वर्गाकडून रुग्णांना सेवा पुरविल्या जाणार आहेत.