शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पेन्शनसाठी दौड - मोलकरणींचा एल्गार : अटक आणि सुटका

By admin | Updated: March 13, 2015 02:42 IST

म्हातारपणाच्या उपजीविकेसाठी पेन्शन देण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेन्शन दौड ...

नागपूर : म्हातारपणाच्या उपजीविकेसाठी पेन्शन देण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेन्शन दौड (मोर्चा) काढण्यात आली. हजारावर मोलकरणी या दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या. झाडू, ताट वाटी घेऊन आलेल्या या मोलकरणींनी घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ही दौड मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचू दिली नाही.सर्वोदय आश्रमसमोर पोलिसांनी कठडे लावून दौड रोखली. मोलकरणींनीसुद्धा ठिय्या मांडला आणि मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत जागेवरून न हटण्याचा निर्णय घेतला. परंतु सायंकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त मोलकरणींनी पोलिसांचे कठडे तोडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यात हजारो मोलकरणींना पोलिसांनी अटक केली. खासदार, आमदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांना म्हातारपणाच्या उपजीविकेसाठी पेन्शन देण्यात येते. परंतु जीवनभर हालअपेष्ठा सहन करणाऱ्या मोलकरणींना, घरेलू कामगारांना मात्र थकत्या वयात कुणीच काम देत नाही. त्यांच्याकडून काम होत नाही. जवळ पैसाही नसतो. अशा परिस्थितीत घेरलू कामगारांना म्हातारपणाची पेन्शन देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेन्शन दौड आयोजित करण्यात आली होती. विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा रूपा कुळकर्णी आणि सचिव विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही दौड निघाली. यात हजारावर मोलकरणी सहभागी झाल्या होत्या. संविधान चौक, शासकीय मुद्रणालय, विज्ञान महाविद्यालय, महाराजबाग चौक, अमरावती रोड, गिरीपेठ मार्गे ही दौड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानी जाणार होती. परंतु पोलिसांनी ही दौड बोले पेट्रोल पंपाजवळील सर्वोदय आश्रम चौकातच अडविली. या ठिकाणी मोलकरणींची जाहीर सभा झाली. मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन देणारे पत्र येत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा रूपा कुळकर्णी अणि विलास भोंगाडे यांनी घेतला. मोलकरणींनीसुद्धा येथेच दडून राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कठडे लावले जात असल्याने पोलीस आणि मोलकरणींमध्ये शाब्दीक बाजाबाचीसुद्धा झाली. सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान मुंबईवरून मुख्यमंत्र्यांच्या सचिवांचे पत्र आले. परंतु पत्रात कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्याने मोलकरणी संतप्त झाल्या आणि कठडे तोडून रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि मोलकरणींमध्ये शाब्दीक बाजाबाचीही झाली. मोलकरणी संतप्त झाल्याने आणि रस्त्यावर येऊन रास्ता रोको करीत असल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली होती. अखेर पोलिसांनी मोलकरणींना अटक करून पोलीस लाईन टाकळीला नेले. या दौडमध्ये कांता मडामे, सुजाता भोंगाडे, छाया चवळे, वंदना माटे, भाग्यश्री ढगे, श्वेता धोटे, सुरेखा डोंगरे, संगीता वाकोडे, ममता पाल, रुखमा भांगे, वंदना फुले आदींसह शेकडो कार्यकर्त्या व घरेलू कामगार सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)