शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पांढराबोडी तलावाचे सौंदर्यीकरण त्वरीत करा

By admin | Updated: August 22, 2014 01:34 IST

पांढराबोडी तलाव कधीकाळी शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक होता. कालांतराने या तलावाचे अस्तित्व संपत गेले. सध्या हा तलाव अतिशय दुर्लक्षित अशा स्थितीत आहे. तलावात घाणीचे साम्राज्य

परिणय फुके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : शासनाकडून ४२५ कोटीचा निधी मंजूरनागपूर : पांढराबोडी तलाव कधीकाळी शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक होता. कालांतराने या तलावाचे अस्तित्व संपत गेले. सध्या हा तलाव अतिशय दुर्लक्षित अशा स्थितीत आहे. तलावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तलावाला नवसंजीवनी मिळावी, सौंदर्यीकरण व्हावे, अशी मागणी येथील नागरिकांनी नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्याकडे केली होती. यासंदर्भात परिणय फुके यांनी महाराष्ट्र शासन व मनपाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ४२५ कोटींचा निधी मंजूर झाला. असे असतानाही सौंदर्यीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण ताबडतोब करावे, असे निर्देश फुके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. अनेक वर्षापासुन पांढराबोडी तलावाचा प्रश्न प्रलंबित होता़ तलावासाठी या परिसरातील नागरिकांना कोर्टाची पायरीसुध्दा चढावी लागली होती़ नगरसेवक परिणय फुके यांनी याकरिता महाराष्ट्र शासन आणि मनपाकडे सतत पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच शासनाने ४२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़ या तलावाच्या विकासामुळे परिसरातील शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे़ सौंदर्यीकरणामुळे परिसराला चौपाटीचे स्वरूप येणार आहे़ तसेच तलावालाही जुने वैभव प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा हा परिसर निसर्गरम्य होईल, अशी माहिती नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांनी दिली़ त्यांनी परिसरातील नागरिकांसह तलावाची पाहणी केली. यावेळी प्रसिध्द अ‍ॅड. आनंद परचुरे, रवि वाघमारे, राधेश्याम समरीत, दत्तात्रय गार्वे, दशरथ घोडमारे, विजय देशपांडे, गणेश जैस्वाल, महेश बारंगे, विजय चिकने, सुनील खंडारे, सुरेश कोहळे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)