कोरोना विषाणूच्या संक्रमणाविरोधात सुरू असलेल्या लसीकरणाची (व्हॅक्सिनेशन) मोहीम देशात वेग धरत आहे. कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या या लढ्यामध्ये दिल्या जाणाऱ्या लसीपासून मिळणाऱ्या फायद्यासंदर्भात अद्यापही जनतेला पूर्ण माहिती नाही. त्यामुळे या लसीकरणावरून अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे.
प्रश्न:लसीकरण कुठून करावे. शासकीय रुग्णालयातून की खासगी रुग्णालयातृून? उत्तम काय आहे?
- शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयातून केलेल्या लसीकरणाचे परिणाम सारखेच आहेत. दोन्हीही सारख्याच सुरक्षित आणि प्रभावी आहेत. लसीकरणाची मोहीम निर्धारित मापदंडानुसार सुरू आहे. सरकारने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन दोन्ही ठिकाणी केले जाते.
प्रश्न : ब्लडशुगर अधिक असेल, डायबिटिज अनियंत्रित असेल तरी लस घेतली जाऊ शकते का?
- ब्लडशुगर नियंत्रणात आणण्यासाठी अपयश येत असेल तरी कोरोना लसीकरण सुरक्षितच आहे. ब्लडशुगर नियंत्रणात येईपर्यंत व्हॅक्सिनेशनची वाट पाहू नये. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल, तर कोरोना संक्रमणाचा धोका आपल्यालार अधिक आहे. यामुळे वाट न पाहता लवकरात लवकर लस टोचून घ्यावी.
प्रश्न : दोन व्हॅक्सिनमध्ये किती अंतर असावे? काही अहवालानुसार, ४५ दिवसाचे अंतर योग्य असते, हे खरे आहेत का?
- भारतीय दिशानिर्देशानुसार, दोन व्हॅक्सिनमध्ये २८ दिवसाचे अंतर असेल तर आपली इम्युन सिस्टिम चांगली प्रतिक्रिया देते. यामुळे पहिल्या व्हॅक्सिननंतर २८ दिवसांनी दुसरे व्हॅक्सिन घेणे उत्तम आहे.
प्रश्न : व्हॅक्सिनेशनच्या एक आठवड्यापूर्वी ब्लडथिनर्स घेणे बंद करावे का?
- व्हॅक्सिनेशनच्या पूर्वी ॲस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल किंवा हेपारिन यासारख्या अथवा अन्य अँटिकोआगुलेंट्स घेणे थांबविण्याची आवश्यकता नाही. आपले औषध लसीकरणानंतरही सुरू ठेवा.
प्रश्न : स्तनदा मातांसाठी व्हॅक्सिनेशन योग्य नाही का?
- सध्या तरी यासंदर्भात स्पष्टता नाही. मात्र व्हॅक्सिन सुरक्षितच आहे. ज्यांचे बाळ सहा महिन्यापेक्षा अधिक मोठे असेल अशा मातांना सुरक्षितपणे व्हॅक्सिन दिले जाऊ शकते.
प्रश्न : एचआयव्ही/एड्स पॉझिटिव्ह रुग्णांसाठी व्हॅक्सिन सुरक्षित आहे का?
- एचआयव्हीमुळे संक्रमित असणाऱ्या व्यक्तींना संक्रमणाचा अधिक धोका असतो. त्यामुळे प्राधान्यक्रमाने त्यांना लस दिली जावी.
प्रश्न : किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लान्ट झाले असेल असे रुग्ण लस घेऊ शकतात का?
- ही लस सर्व लोकांसाठी आणि प्रकारच्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा व्यक्तींना तर इम्युनोसप्रेसिव्ह थेरेपीमधून जावे लागत असल्याने त्यांनीही प्राधान्यक्रमाने ही लस घ्यावी.
प्रश्न : कोणते व्हॅक्सिन उत्तम आहे, कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन?
- खरे तर कोविशिल्डचा स्वीकार अनेक देशांनी केला आहे. मात्र दोन्ही सुरक्षित आणि प्रभावी आहेत. आतापर्यंत भारतामधील हजारो लोकांना दोनपैकी एक व्हॅक्सिन देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणत्याही लसीचे मोठे दुष्परिणाम दिसलेले नाहीत. ज्या व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल, त्याचाच दुसराही डोस घ्यावा.
प्रश्न : टीबी उपचारादरम्यान व्हॅक्सिन सुरक्षित आहे का?
- टीबीचा उपचार सुरू असलेल्या रुग्णांसाठी हे व्हॅक्सिन पूर्णत: सुरक्षित आहे. मात्र अधिक ताप असल्यास हे लसीकरण टाळले जाऊ शकते.
प्रश्न : दात, ऑर्थरायटिस, अनियंत्रित हायपरटेन्शनचा उपचार सुरू असताना लस घ्यावी का?
- यातील कोणत्याची आजारावर उपचार सुरू असेल तरी लस घेता येते.
प्रश्न : कोरोना संक्रमणातून गेलेल्यांच्या लसीकरणाबद्दल काय?
- नक्कीच. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित व्यक्ती सहा आठवड्यानंतर लस घेऊ शकतात. लसीकरणामुळे शरीरामध्ये कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम अँटीबॉडीज तयार होतात, जे संक्रमण रोखून धरतात. शरीराकडून योग्य इम्युन प्रतिक्रिया मिळण्यासाठी दुसऱ्या डोसपासून जवळपास ४५ दिवस लागतात. यादरम्यान लस घेणारी व्यक्ती दुसऱ्याकडून संक्रमित होऊ शकते किंवा आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्हही येऊ शकते. मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही. हे अगदी सौम्य संक्रमण असेल, मात्र त्यासाठी लस जबाबदार आहे, असे समजू नये.