शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शारजाह येथून परतलेले २२ प्रवासी क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विमानतळावर रविवारी पहाटे ३.४५ ला शारजाहवरून ६० यात्रेकरू परतले. या प्रवाशांना विमानातून उतरवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर विमानतळावर रविवारी पहाटे ३.४५ ला शारजाहवरून ६० यात्रेकरू परतले. या प्रवाशांना विमानातून उतरवून जवळपास सव्वातास त्यांची पडताळणी करून क्वारंटाईनसाठी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्या निगराणीत २२ यात्रेकरूंना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले, तर ३८ जणांना क्वारंटाईनमधून सूट दिली. परंतु त्यांना नियमांचे पालन करीत आठवडाभर होम आयसोलेशन राहावे लागणार आहे. आंतराष्ट्रीय प्रवासावरून परतणाऱ्या प्रवाशांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. रविवारी शिवाय २१ व २८ फेब्रुवारीला शाहजाह येथून यात्रेकरू परतणार आहेत. त्यांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शारजाह येथून एअर अरेबियाच्या विमानाने ६१ प्रवासी येणार होते. परंतु एक प्रवासी काही कारणास्तव नागपूरला परतला नाही. उर्वरित १४ प्रवासी नागपूर शहराबाहेरचे असून, ४६ नागपूरचे आहेत. ज्या ३८ जणांना क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे, त्यांना मनपाने निर्धारित केलेल्या पाच मानकांची पूर्तता केली. त्यानंतर त्यांना क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली.

मनपाचे उपअभियंता आनंद मोखाडे, कनिष्ठ अभियंता दीपक मेश्राम, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संजय बिसेन यांची प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आपली बसचे पाच व १० एनडीएस पथकातील जवान तैनात करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, मनपाच्या आदेशानुसार पाच प्रकारच्या लोकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात ६५ वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्ती, गर्भवती महिला, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे पालक, कॅन्सर रुग्ण, दिव्यांग, मानसिक रुग्ण, सेलेब्रल पाल्सीग्रस्त आदींच्या सोबत ज्यांच्या कुटुंबातील कुणी गंभीर आजारी आहेत. गंभीर दुर्घटनाग्रस्त, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास अशा व्यक्तींना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावे लागतील. त्यांना होम क्वारंटाईन राहावे लागेल. कोविड नियमांचे पालन करावे लागेल.

....

यात्रेकरूंनी केले सहकार्य - निपाणे

यात्रेकरूंनी मनपा प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. पाच मानकानुसार त्यांनी कागदपत्रे सादर केली. क्वारंटाईन नियमाचे प्रवाशांना पालन करावे लागेल. २२ पैकी ८ यात्रेकरूंना व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले. उर्वरित यात्रेकरूंना हॉटेलमध्ये असलेल्या क्वारंटाईन केंद्रावर पाठविण्यात आल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिली.

-