शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या कलावंताचे दर्जेदार सादरीकरण

By admin | Updated: December 30, 2014 00:56 IST

बालकलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य महोत्सवात सोमवारी चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

राज्य बालनाट्य स्पर्धा : नाट्यरसिक मंत्रमुग्धनागपूर : बालकलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य महोत्सवात सोमवारी चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. हा महोत्सव सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे सुरूआहे. यात संस्कार, तमसो मा ज्योतिर्गमय, नवे गोकुळ आणि सोनेरी पान या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात चिमुकल्या कलावंतांनी सादर केलेल्या दर्जेदार अभिनयाने उपस्थित नाट्यरसिक मंत्रमुग्ध झाले. नैतिक संस्काराची शिकवण ‘संस्कार’विद्यार्थ्यांच्या बालमनाच्या निकोप व सशक्त संवर्धनासाठी अनिवार्य अशा नैतिक संस्काराच्या शिकवणुकीचे महत्त्व विशद करणारे ‘संस्कार’ या नाटकाचे सादरीकरण छत्रपती युवक क्रीडा प्रसारक मंडळ महालतर्फे करण्यात आले. आजच्या वैज्ञानिक युगात ऱ्हास पावणाऱ्या नैतिक मूल्यांबद्दल अस्वस्थता व्यक्त करणाऱ्या या सादरीकरणात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्याधिष्ठित आदर्श जीवन प्रणालीवर भर देण्यात आला. नाटकाचे लेखन सीमा फडणवीस यांनी केले. दिग्दर्शन सुबोध आष्टीकर यांचे होते. विधी पेटकर, अंजली नंदवंशी, जान्हवी ढोके, प्राची बसाके, धनश्री भेंडे, प्रणाली मारोडकर, मिताली गौरकर, साक्षी तिजारे, जान्हवी कोंगलवार, प्राची मानापुरे, केशरी मौंदेकर, दिव्या शेळके या कलावंतांचा यात सहभाग होता. आनंदी जगण्याचा संदेश देणारे ‘तमसो मा ज्योतिर्गमय’अंध मुलांच्या दु:खी मनोभावनांवर हळुवार फुंकर घालणारे व प्राप्त परिस्थितीवर मात करून आनंदी जगण्याचा संदेश देणाऱ्या ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ नाटकाचे सादरीकरण दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, महालतर्फे करण्यात आले. विशाल तराळ लिखित या नाटकाचे दिग्दर्शन रोशन नंदवंशी यांनी केले. यात श्रेया कुराडे, अंजली तिवारी, श्रद्धा परिहार, प्राची रणदिवे, प्रियंका वंजारी, अवंती कुर्रेवार, जान्हवी हुकरे, अमिषा निचंत, ऐश्वर्या डवरे यांनी अभिनय केला. श्रमाचे महत्त्व विशद करणारे ‘नवे गोकुळ’जीवनातील श्रमाचे महत्त्व सांगणाऱ्या गंभीर विषयाला विनोदाची जोड देऊन भरभरून मनोरंजन करणारे ‘नवे गोकुळ’ या नाटकाने रसिकांना जिंकले. नाटकातील सोंगाड्याचा अभिनय प्रशंसनीय ठरला. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ महालद्वारे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. पु. ल. देशपांडे लिखित या नाटकाची निर्मिती रवींद्र फडणवीस यांनी केली. दिग्दर्शन अर्चना घुळघुळे यांचे होते. यात युक्ता हजारे, अपूर्व देवरणकर, श्वेता बावनकुळे, सेजल पापडकर, दीपाली मानकर, वैष्णवी हुकरे, आदिती हरदास, शिप्रा विटाळकर, सेजय कोलूरवार, साक्षी तीनखेडे, अपूर्वा गवळी, धनश्री माताघरे, ऋतिका गोखे, सायली घाटोळे, खुशी गोखे, मृणाली मेरखेड, दीपाली वाघमारे, रुचिका मारघडे, कल्याणी देशमुख यांनी अभिनय केला. (प्रतिनिधी)