सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुलाबी बाेंडअळीमुळे कापसासाेबत सरकी आणि त्यापासून तेल व ढेपेचे उत्पादन व दर्जा खालावला आहे. ही बाेंडअळी बाेंडांमधील सरकी खात असल्याने तसेच त्यांच्या विष्ठेमुळे बाेंडात बुरशी तयार हाेते. हीच बुरशी पुढे ढेपेत संक्रमित हाेत असल्याने गुरांना पाेटाचे आजार बळावत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांनी दिली. ही अळी सरकीतील स्निग्ध पदार्थ खात असल्याने यावर्षी तेलाच्या उत्पादनात घट आली असून, ढेप अधिक काळ टिकून राहत नसल्याने त्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याची माहिती तेल उत्पादकांनी दिली.
गुलाबी बाेंडअळी कपाशीच्या पुंकेसरसाेबत बाेंडात शिरून सरकी पाेखरते. त्यामुळे सरकीतील स्निग्ध पदार्थ प प्राेटिनचे प्रमाण कमी हाेते. बाेंडातच तिची विष्ठा राहत असल्याने व ती काेषात जात असल्याने आत बुरशीचा प्रादुर्भाव हाेताे. या सरकीपासून तयार हाेणाऱ्या ढेपेतही बुरशीचे व नंतर जीवाणूचे संक्रमण हाेत असल्याने सरकी व ढेपेतील पाेषण मूल्ये संपली आहेत. ढेपेची टिकून राहण्याची व साठवण क्षमता कमी झाली आहे. आपल्या देशातून चीन, बांगलादेश व श्रीलंकेत ढेपेची निर्यात हाेत असून, दर्जा खालावल्याने निर्यात तसेच देशांतर्गत बाजारातील ढेपेची किंमत घटली आहे, अशी माहिती तेल उत्पादकांनी दिली.
...
कापूस - सरकी - तेल यांचे प्रमाण
एक क्विंटल कापसापासून सरासरी ६३.५ किलाे सरकी मिळते. एक क्विंटल सरकीपासून १३ किलाे तेल, ८२ किलाे ढेप व तीन किलाे साबण तयार करण्यासाठी वापरले जाणारे उत्पादन मिळते. या प्रक्रियेत दोन किलाेची तूट येते. गुलाबी बाेंडअळीमुळे तेलाचे उत्पादन १३ किलाेवरून साडेनऊ ते १० किलाेवर आले आहे. मागील वर्षी सरकीचे दर १,८०० ते २,३०० रुपये प्रतिक्विंटल हाेते. काेराेना संक्रमण व ‘लाॅकडाऊन’मुळे ढेपेची मागणी घटली हाेती. यावर्षी सरकीच्या दरात वाढ अपेक्षित असताना ते २,२०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे. सरकीतील तेलाचे प्रमाण घटल्याने दर स्थिर असल्याची माहिती तेल उत्पादकांनी दिली.
.....
गुरांच्या आराेग्यावर परिणाम
ढेपेतील बुरशी व जीवाणूमुळे गुरांना विषबाधा व दुधाचे प्रमाण कमी हाेते. गुरांची पचनशक्ती चांगली राहत असल्याने हा परिणाम माेठ्या प्रमाणात जाणवत नाही. त्यामुळे त्याच्यावर फारसे संशाेधनही हाेत नाही. बुरशी व जीवाणूमुळे गुरांना ‘ऑक्झेलेट पाॅयझनिंग’ हाेत असून, यात गुरांना उत्सर्जन क्रियेचा त्रास हाेताे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांनी दिली.
....
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक बियाणे वापरण्यास परवानगी द्यावी. ते उपलब्ध करून द्यावे. तंत्रज्ञान ‘अपग्रेडेशन’ प्राेत्साहन देणे गरजेचे आहे. ‘टेक्नाॅलाॅजी अपग्रेड’ हाेत नसल्याने त्याचा आपल्या देशातील कापड, सरकी, तेल उद्याेगाला जबर फटका बसत आहे.
- विजय निवल,
माजी सदस्य, काॅटन ॲडव्हायझरी बाेर्ड.