शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पाराणी दीदी यांनी विदर्भात मानवता जागविली

By admin | Updated: April 24, 2017 01:47 IST

राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी दीदी यांना ज्यावेळी नागपूरचा कार्यभार देण्यात आला,...

पुष्पाराणी दीदी यांचे प्रथम पुण्यस्मरण : पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन नागपूर : राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी दीदी यांना ज्यावेळी नागपूरचा कार्यभार देण्यात आला, तेव्हापासून त्यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या माध्यमातून विदर्भात मानवता जागविण्याचे महान कार्य केले. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्घांजली ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जामठा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठात रविवारी आयोजित राजयोगिनी पुष्पाराणी दीदी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. बावनकुळे पुढे म्हणाले, एका संस्कारातून पुढील तीन पिढ्या संस्कारित होतात. त्यानुसार पुष्पाराणी दीदी यांनी नागरिकांच्या मनातून प्रदूषण दूर करून त्यांना सुसंस्कृत आणि अध्यात्मवादी बनविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. या कार्यक्रमाला माऊंट अबू येथून आलेले सूरजभाई, रुक्मिणी दीदी, रमेश दीदी, खासदार विकास महात्मे, माजी न्यायाधीश एस. डोणगावकर, माजी मंत्री रमेश बंग, विनोद गुडधे पाटील, आरएसएसचे महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. दिलीप म्हसे, शिशिर दिवटे, सुशील अग्रवाल व भाई देवकुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमरावती केंद्राच्या संचालिका सीता दीदी यांनी केले तर नागपूर केंद्राच्या संचालिका रजनी दीदी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)दु:खातही संयमातून मिळाली प्रेरणा यावेळी खासदार विकास महात्मे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कधी ना कधी दु:ख येतातच. परंतु व्यक्तीने दु:खातही मनाला कसे बलवान ठेवायचे, त्यासाठी पुष्पाराणी दीदी यांच्याकडून प्रेरणा मिळते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठ हे जगातील एकमेव असे केंद्र आहे, की ज्याचे संपूर्ण संचालन महिलांच्या हाती आहे, असेही त्यांनी सांगितले. राजेश लोया म्हणाले, पुष्पाराणी दीदी ममता आणि वात्सल्याच्या मूर्ती होत्या. शिवाय रुक्मिणी यांनी विदर्भात १२३ केंद्र आणि उपसेवा केंद्र सुरू करून नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुष्पाराणी दीदी यांनी जीवनभर प्रयत्न केल्याचे सांगितले.