शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना दे धक्का..

By admin | Updated: May 12, 2015 02:27 IST

‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई : २९० शाळांना नोटीसनागपूर : ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या किंवा शुल्क मागणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. दरम्यान, शिक्षण विभागानेदेखील मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर लगेच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत शहरातील २९० शाळांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. ज्या शाळा यात टाळाटाळ करतील त्यांची मान्यतादेखील रद्द होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.‘आरटीई’च्या ‘आॅनलाईन’ सोडतीमध्ये क्रमांक लागूनदेखील पालकांना प्रवेशासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. कोणी ‘एन्ट्री पॉईन्ट’चे कारण दाखविले तर अनेकांनी पालकांकडून विविध नावांखाली शुल्काची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेदेखील तक्रारी गेल्या होत्या. नवी मुंबईच्या पाटणकर दाम्पत्याने त्यांच्या जुळ्या मुलींना ‘आरटीई’नुसार प्रवेश मिळत नसल्याची तक्रार मांडली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या शाळा या कायद्याच्या तरतुदीनुसार प्रवेश देत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निर्देशच त्यांनी दिले आहेत.दरम्यान, ७ मे रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी सर्व शाळांना पत्र लिहिले होते. शाळा ‘आरटीई’ अंतर्गत नर्सरी, केजी-१ व पहिल्या इयत्तेत प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. शासनाच्या ३० एप्रिल २०१५च्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शाळांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू नये असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु तरीदेखील शाळांनी याला गंभीरतेने घेतलेले नाही. त्यामुळेच २९० शाळांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनिल पारधी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)केवळ इशारे नकोतशिक्षण विभागाकडून ‘आरटीई’च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध ठोस पावले उचलण्यात येत नाहीत. केवळ इशारे देऊन काहीही होणार नाही, तर अशा शाळांवर तत्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. प्रवेश नाकारणाऱ्या सर्व शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’चे अध्यक्ष शाहीद शरिफ यांनी केली आहे.