शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चळवळ राबविताना हेतू शुद्ध असावा!

By admin | Updated: April 14, 2015 00:11 IST

चैत्यभूमी ट्रस्टचे व्यवस्थापक भंते बी. संघपाल यांची ‘लोकमत’शी बातचीत.

राजरत्न सिरसाट/अकोला : धम्म, आंबेडकर चळवळ राबविताना हेतू शुद्ध असणे गरजेचे आहे. कारण क्षणाक्षणाला मन आणि मत परिवर्तन होत आहे. त्यासाठी मनावर विश्‍वास ठेवावा लागणार असून, त्याला नैतिकतेची जोड द्यावी लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्ध धम्मातील लोकांनी असा संकल्प केला, तर धम्मचळवळ गतिमान होण्यास वेळ लागणार नाही, असे विचार चैत्यभूमी ट्रस्टचे व्यवस्थापक भंते बी. संघपाल यांनी मांडले भंते बी. संघपाल अकोला दौर्‍यावर आहेत. अकोला तालुक्यातील सांगळूद येथे श्रामणेर शिबिराला आले असताना त्यांनी ह्यधम्म चळवळ व डॉ. आंबेडकर जयंतीह्ण या विषयावर खास ह्यलोकमतह्णशी बातचीत केली.प्रश्न-धम्म चळवळ पुढे नेण्याचे काम भंते तर करीत आहेत?उत्तर-बरोबर आहे. भंते धम्म चळवळीचे काम करीत आहेत, पण त्याला समाजबांधवांची जोड लागेलच ना, बौद्ध समाज शिकला, प्रगल्भ झाला, पण वर्तमान स्थिती म्हणावी तेवढी समाधानकारक नाही. चळवळ सुरू आहे, त्याला गती नाही. त्यांची अनेक कारणे असली तरी हेतू शुद्ध असला तर मात्र चळवळ थांबत नाही; पण येथेच मत, मन परिवर्तन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.प्रश्न- चळवळ दिशाहीन झाले असे आपणास म्हणायचे का?उत्तर- असेही काहीसे म्हणता येईल, कारण धम्म, आंबेडकर चळवळीसाठी आंबेडकरी कवी, गायक, पूर्वजांनी रक्त ओतलं आहे. त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता समाज, चळवळीला वाहून घेतले होते, टी.एल. शिशूपाल, संजय पवार, श्रीधर ओव्हळ, गोविंद म्हशीलकर यांनी या चळवळीला गीत, गायनातून मोठे केलं म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे सभांचं काम हे कवी करीत आहेत. गोविंद म्हशीलकर पोटतिडकीने बाबासाहेबांचे विचार, चळवळ गीतातून मांडायचे, तेव्हा खोकताना त्यांच्या घशातूून रक्त पडायचे. समाजाने त्यावेळी रक्त ओतून ही चळवळ निर्माण केली आहे. कारण उद्याची िपढी ही बाबासाहेबांच्या विचारांची घडेल, असा त्यांना विश्‍वास होता. पण आज त्यांच्या रक्ताची किंमत समाज विसरत चालला असून, बाबासाहेबांच्या विचाराचा रथ थांबला की काय, असे वाटायला लागले आहे. प्रश्न-चळवळ गतिमान करण्यासाठी काय करावे, असे तुम्हाला वाटते?उत्तर - मन चंचल आहे, त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. त्यासाठी बुद्ध धम्मात पंचशील आहे, बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. यांचे तंतोतंत पालन केल्यास मन भटकत नाही, हेतू ढासळत नाही, त्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. कारण पूर्वजांनी आर्थिक स्थिती बघितली नव्हती. समाज परिवर्तनासाठी त्यांनी स्वत:ला चळवळीत झोकून दिले हो ते, आज ती परिस्थिती नाही आणि रक्त ओकण्याची गरज नाही. बाबासाहेबांच्या पुण्याईने समाजातील अनेक लोक चांगली कमाई करीत आहेत. आर्थिक संपन्न झाले आहेत. पण या पैशाचे नियोजन कशासाठी करावे, हेच त्यांना सुचत नाही. समाजाला वर आणण्यासाठीचे प्रयत्न थिटे पडत आहेत, हेच त्यांचे अज्ञान आहे.प्रश्न- नेमके काय कारण असावे या मागे? उत्तर- खरे तर याला आंबेडकरवादी म्हणणारे राजकीय पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. बाबासाहेबांच्या पुण्याईने पैसा आला, पण त्याचे नियोजन करता येत नसल्याने समाजातील लोक व्यसनाधिनतेकडे वळत आहेत. राजकीय स्वार्थापोटी या व्यसनाधिनतेत गुंतवले जात आहेत. नशा माणसाला सर्व गोष्टी करायला शिकवते, त्यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. म्हणूनच चळवळीला गतिमान करायचे असेल तर मिळणार्‍या पैशापेक्षा स्वाभिमान जपण्याची गरज आहे. समाजहितावर खर्च करावे, समाजातील गरिबांना मदत करावे, होतकरू ंना उद्योग सुरू करू न द्यावे, त्याचा उद्योग सुरू झाल्यास तो समाजाला मदत करण्यास पुढे येईल, पण असे होत नसल्याचे चित्र आहे. प्रश्न- डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी ? उत्तर- सन १४ एप्रिल १९५१ मध्ये डॉ. बाबासाहेबांचा साठावा वाढदिवस परेळ मुंबई येथील दामोदार हॉलमध्ये साजरा करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले होते. या सभेत बाबासाहेब म्हणाले होते, माझा जयजयकार करण्यापेक्षा मी जे सांगतो ते समाजात रुजवा, माझे विचार डोक्यात घ्या, परिवर्तन करा, निष्ठावान कार्यकर्ते घडवा, पण आज सर्व विपरीत सुरू आहे. डीजे, ढोल ताशे लावून मद्यधुंद अवस्थेत नाचून जयंती साजरी केली जात आहे. लाखो रुपये त्यावर खर्च केले जात आहेत. हे बदलण्याची गरज असून, समाजातील लोकांनी हा धोका वेळीच ओळखण्याची गरज आहे.प्रश्न- मंबई दादर येथील चैत्यभूमी ट्रस्टचा काही वाद आहे का ? उत्तर- कोणताही वाद नाही, चैत्यभूमी ट्रस्ट वेगळी आहे. भैयासाहेब आंबेडकरांनी हे स्मारक बांधले आहे. त्यांनी भीमज्योत यात्रा काढली होती. या यात्रेतून गोळा झालेल्या पैशातून हे स्मारक उभे केले आहे. मीराताई आंबेडकर या त्या ट्रस्टच्या सदस्या आहेत.