शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पंप हाऊसची इमारत कोसळली

By admin | Updated: August 23, 2014 02:59 IST

रेल्वेची जीर्ण इमारत पडल्यामुळे मलब्याखाली दबून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर, तिघे जखमी झाले. यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

नागपूर : रेल्वेची जीर्ण इमारत पडल्यामुळे मलब्याखाली दबून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर, तिघे जखमी झाले. यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे. आज दुपारी १.३० च्या सुमारास अजनी रेल्वे वसाहतीतील निक्सू चौकाजवळ ही घटना घडली. निलय श्यामराव रंगारी (वय १६, रा. सावित्रीबाई फुलेनगर अजनी) असे मृताचे तर कौस्तुभ डांगरे (वय १७) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. निक्सू चौकाजवळ अजनीत जनमंडल स्कूल आहे. त्याला लागूनच रेल्वेचे जुने मोटर पंप हाऊस आहे. येथे जमिनीत पाण्याचे मोठे टाके आहे. मोटर पंप हाऊस कार्यालयाची इंग्रजकालीन इमारत होती. ती जीर्ण झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी हे कार्यालय इतरत्र हलविण्यात आले. या पडक्या इमारतीत सभोवताल मोठ्या प्रमाणात झाडंझुडपं वाढलेली आहेत. त्यामुळे या इमारतीचा वापर काही जण जुगार खेळण्यासाठी आणि दारू, गांजासाठी करतात. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी कधी कधी या टाक्यात पोहण्यासाठी येतात. निलय रंगारी, कौस्तूभ डांगरे, अंकुश मडावी (वय १७, रा. पार्वतीनगर), अनिकेत अनिल बहादुरे (वय १७) आणि निखिल घोटकर (वय १७, रा. चंद्रमणीनगर) हे पाच मित्र आज दुपारी १.३० च्या सुमारास पाण्याच्या टाक्यावर पोहचले. त्यातील अनिकेत इमारतीच्या बाहेरच थांबला. तर, उर्वरित चौघे आतमध्ये जाऊन एकमेकांसोबत मस्करी करू लागले. अचानक इमारत कोसळली. या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडी पोल आणि पाईपचा वापर करण्यात आला. त्यातील काही पोल वाकल्यामुळे त्या पोकळीत अंकुश आणि निखिल सापडले. परिणामी त्यांना जुजबी दुखापत झाली. मात्र, निलयच्या अंगावर पाईप आणि मलबा पडल्यामुळे तो पुरता दबला. तर, कौस्तुभचा हात मलब्यात फसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. बाहेर असलेल्या अनिकेतने पळत येऊन चौकातील दुकानदारांना ही माहिती दिली. त्यामुळे ते घटनास्थळी धावले. बाजूला असलेल्या शाळेचे कर्मचारीही धावले. तोपर्यंत अंकुश आणि निखिल मलब्याच्या पोकळीतून बाहेर आले होते. घटनेची माहिती कळताच अजनीचे ठाणेदार लक्ष्मणराव डुंबरे, पीएसआय संदीप मोरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी अग्निशमन दल आणि जेसीबीही मदतीला बोलवून घेतली. काही वेळेतच कौस्तुभ आणि निलयला मलब्यातून बाहेर काढून मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच निलयने प्राण सोडला. तो दहावीचा विद्यार्थी होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले. अंकुश आणि निखिल संताजी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत तर, अनिकेत सिध्देश्वर ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी होय. (प्रतिनिधी)