शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
3
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
4
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
5
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
6
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
7
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
8
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
9
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
10
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
11
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
13
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
14
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
15
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
16
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
17
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
18
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
19
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या

रुग्णांच्या आहारातून पोळी गायब

By admin | Updated: August 23, 2015 02:55 IST

नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी रुग्णांना मोजकाच आहार पुरवला जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे.

मेडिकलमधील रुग्णांना मोजकाच आहार : कर्मचाऱ्यांच्या संख्येवर ठरते पोळ्यांचे ‘गणित’लोकमत विशेषसुमेध वाघमारे  नागपूरनियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी रुग्णांना मोजकाच आहार पुरवला जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, आता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर रुग्णांचा आहार अवलंबून आहे. ज्या दिवशी पूर्ण कर्मचारी हजर असतील त्याच दिवशी भाजी, पोळी, वरण-भात असा आहार मिळतो आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्यास आहारातून पोळी गायब तर कधी केवळ एकाच पोळीवर रुग्णांना समाधान मानावे लागते. आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशानेच मेडिकलमध्ये पाकगृहाची सुरुवात झाली. सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे ८०० रुग्णांना नाश्त्यासह दोन वेळचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा नेहमीचा मेनू ठरला आहे. रुग्णांचा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात यावा, असा नियम आहे. मात्र, त्याचे किती पालन होते हे रोजच्या जेवणाच्या पदार्थातून दिसून येते. विशेष म्हणजे, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा मिळाल्यावरच पाकगृहात तयार झालेला पदार्थ रुग्णांपर्यंत पोहचतो. परंतु रुग्णांना देण्यात येणारा आहार पौष्टिक तर नाहीच उलट मोजकाच असला तरी ‘समाधानकारक’ शेरा मारणे सुरू आहे. ३२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त मेडिकलच्या पाकगृहासाठी ५२ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना तब्बल ३२ पदे रिक्त आहेत. २० कर्मचाऱ्यांच्या भरोशावर मेडिकलचे पाकगृह कसेबसे सुरू आहे. पाकगृहात दोन पाळीत आहार तयार केला जातो. पूर्वी प्रत्येक पाळीत २६ कर्मचारी असायचे परंतु वेळोवेळी रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने आता एका पाळीत केवळ १० कर्मचारी असतात. यात साप्ताहिक सुटी, तर कोणी रजेवर गेल्यास याचा सर्वाधिक प्रभाव पोळ्या तयार करण्यावर होतो. जास्त कर्मचारी सुटीवर असल्यास त्या दिवशी पोळ्याच तयार होत नाही तर कमी कर्मचारी असल्यास त्या दिवशी प्रत्येक रुग्णाला एक पोळी मिळेल अशीच व्यवस्था असते. प्रति रुग्णामागे शासन देते केवळ २५ रुपयेप्रति रुग्णाच्या नाश्त्यासह दोन वेळेच्या आहारावर शासन केवळ २५ रुपये खर्च करते. रुग्णालय प्रशासनाला प्रति रुग्णामागे साधारण ५० रुपये खर्च येतो. आधीच रुग्णालयात औषधांपासून इतर सर्व वस्तूंची चणचण असताना हा खर्च पेलवणे प्रशासनाला अवघड जात आहे. यामुळेच रुग्णाला शेंगदाण्याचा लाडू आणि उकडलेले अंडे देणे बंद झाले आहे. वरण-भात व जास्तीत जास्त वेळा भोपळ्याची भाजी तेवढीच काय रुग्णाच्या नशिबी आली आहे.