शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी हायकोर्टात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 22:05 IST

Close Religious Places, PIL , High court कोविड महामारीचा प्रभाव कमी होईपर्यंत कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्यात येऊ नये, अशी मागणी समाज क्रांती आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. संघटनेने यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोविड महामारीचा प्रभाव कमी होईपर्यंत कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्यात येऊ नये, अशी मागणी समाज क्रांती आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. संघटनेने यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद खैरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. शनिवारी पत्रपरिषदेद्वारे अ‍ॅड. खैरे यांनी भूमिका मांडली. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत जोपर्यंत आपत्ती कमी होत नाही तोपर्यंत लोकांच्या जिवितांच्या सुरक्षेच्या दृष्टिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात यावी, अशी तरतूद आहे. त्यामुळे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली धार्मिक स्थळे उघडण्यास घाई करू नये, असे आवाहन केले. न्यायालयाने जनहित याचिका स्वीकारून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मुख्यमंत्री व सचिवांसह वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे चंद्रकांत पाटिल यांना नोटीस बजावली असल्याचे अ‍ॅड. खैरे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेत प्रदीप फुलझेले, लालचंद लवात्रे, सुनिल जांभुळकर, माणिक सुर्यवंशी, सारथीकुमार सोनटक्के, अशोक मेश्राम, सुगत रामटेके, रामचंद धोंगडे, अजय डंबारे, भिमराव नंदेश्वर, तुकाराम सोनारे, संगिता खोब्रागडे, सुनिता रंगारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयReligious Placesधार्मिक स्थळे